Marathwada Flood : मायबाप सरकार तुम्हीच सांगा कसं जगायचं? शेतकऱ्याचा आर्त सवाल

Marathwada Flood update : पुराच्या पाण्यामुळे धाराशिवमधील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालयं. या नुकसानीची भीषणता दाखवण्यासाठी साम टीव्हीचे प्रतिनिधी थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहचले. शेतकऱ्याचं दु: ख जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही जगायचं कसं? असा आर्त सवाल शेतकऱ्यांनी केलाय. बळीराजाच्या दुःखावर फुंकर मारणारा साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट....
Marathwada Flood news
Marathwada Flood Saam tv
Published On

धाराशिवमधील भुम मधलं बेलगाव शिवार...बाणगंगा नदीला आलेल्या पूरानं अवघ्या 25 मिनिटात होत्याचं नव्हतं केलं...पुरामध्ये विश्वनाथ यांचा 25 वर्ष खपून पोटच्या लेकराप्रमाणे जपलेली जनावरं डोळ्यासमोर वाहून गेली...पुराच्या पाण्यात एक दोन नव्हे तर तब्बल 27 गायी वाहून गेल्या...सगळा गोठा उद्धवस्त झाला...

Marathwada Flood news
Mumbai Crime : मुंबईत दुहेरी हत्याकांड, निर्दयी मुलाकडून वडील आणि आजोबाची हत्या; परिसरात खळबळ

केवळ विश्वनाथच नव्हे तर बेलगाव शिवारातील अनेक शेतकरी कुटंबाची स्वप्न पूराच्या पाण्यात वाहून गेली...

समाधान दातखिळे यांनी अडीच एकरात सिमला मिर्चीच पीक घेतलं..विक्रीसाठी म्हणून शेतातल्या घरात काढूनही ठेवलं...

मात्र पुराच्या पाण्यात या भाजीपाल्याचा चिखल झाला..आता यासाठी घेतलेलं 5 लाखाचं कर्ज कसं फेडायंच..सणासुदीच्या काळात कुंटबाला काय खायला घालायंच हा प्रश्न ते विचारताय...

Marathwada Flood news
Raj Thackeray : जाहिरातबाजी महाराष्ट्राची संस्कृती नव्हे, बळीराजाचं कुटुंब पुन्हा उभं करा; राज ठाकरेंचं CM फडणवीसांना खुलं पत्र

हीच परिस्थिती बेलगाव शिवारातल्या रुपाली ठोमरेंची.. पै-पै जोडून उभारलेलं चार भिंतींचं घर पडलं...घरातील सोनं नाणं,खाण्या पिण्याचं सामान, मुलांची पुस्तकं सगळ काही पूराचं पाणी स्वत:बरोबर सगळं घेऊन गेलं ..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com