नवी दिल्ली : ईडीने झारखंडमध्ये मोठी कारवाई केली आहे. ईडीने झारखंड सराकरमधील ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली आहे. मंत्री आलम यांचे पीए संजीव कुमार लाल यांच्या नोकराच्या घरात ३२ कोटी २० लाख रुपये आढळले होते. यानंतर ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.
ईडी चौकशीनंतर मंत्री आलम यांच्यावर कारवाई केली आहे. आलमगीर आलम यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांना एक मेडिकल टीम आरोग्य कार्यालयात पोहोचली. या टीमने मंत्री आलम यांच्या आरोग्याची तपासणी केली. या अटकेनंतर त्यांची पत्नी आणि मुलगी ईडी कार्यालयात भेटण्यासाठी पोहोचल्या.
ईडीने आलमगीर आलम यांना १४ मे रोजी रांचीच्या झोनल कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी केलं होतं. आलमगीर यांचे पीएस संजीव लाल यांच्या घरातील नोकराकडे कोट्यवधींची रोकड आढळली होती. त्यानंतर ईडीने त्याच्याकडील ३२ कोटी २३ लाख रुपयांची रक्कम जप्त केली. पुढे एका दिवसांनी त्याला अटक केली. त्याचीही चौकशी सुरु आहे.
ईडीकडून झारखंडच्या ग्रामीण विकास कथित मनी लॉड्रिंग प्रकरणी चौकशी सुरु आहे. ईडीने आतापर्यंत ७ ठिकाणी छापे टाकले आहेत. आतापर्यंत या छापेमारीत मोठी रक्कम जप्त केली आहेत. या पैकी नोकर आलम याच्याकडे सर्वाधिक रक्कम आढळली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.