Bus Accident: ओव्हरटेक करताना भीषण अपघात; खासगी बस कंटेनरला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू

Tamil Nadu Bus Accident : तामिळनाडूच्या चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावरील बुधवारी रात्री एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला असून १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
Tamil Nadu Bus Accident
Tamil Nadu Bus AccidentANI

तामिळनाडूच्या चेन्नई-त्रिची राष्ट्रीय महामार्गावरील बुधवारी (ता. १५) मध्यरात्रीच्या सुमारास एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. प्रवाशांची खचाखच भरलेल्या बसने कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की बसचा अक्षरश: चक्काचूर झाला. या दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Tamil Nadu Bus Accident
Accident News: कार्यक्रम आटोपून परतत असताना बोलेरोचा भीषण अपघात; ८ जणांचा जागीच मृत्यू

अपघातात १५ हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. स्थानिकांच्या मदतीने बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. प्राथामिक माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस चेन्नई येथून प्रवाशांना घेऊन त्रिचीकडे निघालेली होती. एका कंटनेरला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले.

काही क्षणातच बस कंटेनरला पाठीमागून जाऊन धडकली. अपघात इतका भीषण होता, की बसचा क्लिनरच्या बाजूचा भाग दूरपर्यंत कापत गेला. या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. सध्या १५ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

मध्यप्रदेशात बोलेरोचा अपघात ८ ठार

मध्य प्रदेशातील इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका अज्ञात वाहनाने बोलेरो कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. जखमीवर रुग्णालय उपचार सुरू आहेत.

Tamil Nadu Bus Accident
Andhra Pradesh Accident News: बस ट्रकची भीषण धडक, ६ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जखमी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com