Andhra Pradesh Accident News: बस ट्रकची भीषण धडक, ६ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जखमी

Bus Truck Road Accident: आंध्र प्रदेशमध्ये रस्ता अपघातात सहा जणांचा मृ्त्यू झालाय. बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथे ही दुर्घटना घडली आहे.
आंध्र प्रदेशमध्ये रस्ता अपघात
Andhra Pradesh Accident NewsYandex

आंध्र प्रदेशमध्ये (Andhra Pradesh) रस्ता अपघातात सहा जणांचा मृ्त्यू झालाय. बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथे ही दुर्घटना घडली आहे. अनेकजण या दुर्घटनेत जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही बस बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून हैदराबादला जात होती. त्यावेळी तिची चिल्कालुरीपेट येथे ट्रकला धडक झाली. यामध्ये सहा जण ठार झाले, अशी माहिती पोलिसांनी आज दिली आहे.

अपघातानंतर बसला (Andhra Pradesh Accident News) आग लागली होती. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झालाय. तर ३२ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, ही बस चिन्नागंजमहून हैदराबादला जात होती. या अपघाताचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या अपघातात ट्रक आणि बस चालकाचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे.

या व्हिडिओमध्ये बस आगीनं वेढलेली दिसत (Bus Truck Road Accident) आहे. या धडकेमुळे लागलेल्या आगीचं स्वरूप खूप भीषण होतं. यामध्ये बस आणि ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये अग्निशमन दलाचे काही जवान ही आग विझवताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हे व्हिडिओ समोर आले आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक आंध्र प्रदेशमधील बापटला जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आहे. आतापर्यंत ४ मृतकांची ओळख पटली आहे. उर्वरित दोन जणांची ओळख अजून पटलेली नाही. या अपघातात एकून ३२ जण जखमी झाले आहेत.

आंध्र प्रदेशमध्ये रस्ता अपघात
Ghatkopar Hoarding Accident: मुलांना घराबाहेर जाऊ देऊ नको, पत्नीला केलेला कॉल ठरला शेवटचा; ठाण्यातल्या कुटुंबाचा आधारच हिरावला!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस बापटला जिल्ह्यातील चिन्नागंजम येथून हैदराबादकडे जात होती. त्यानंतर हैदराबाद-विजयवाडा महामार्गावरील चिलकलुरीपेट मंडळाजवळ बस ट्रकला (Accident News) धडकली. या धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. काही वेळातच संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. या भीषण अपघातात ट्रक आणि बस चालकाचा जागीच मृत्यू झाला. बसमध्ये प्रवास करणाऱ्या अन्य चार जणांचाही वाटेतच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये ४२ जण प्रवास करत असल्याचं जखमींनी सांगितलं आहे.

आंध्र प्रदेशमध्ये रस्ता अपघात
Ghatkopar Hoarding Accident: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमींना आणि मृतांच्या कुटुंबीयांना किती मदत?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com