Mamata Banerjee: 'इंडिया आघाडीचं केंद्रात सरकार आल्यास बाहेरून पाठिंबा देऊ...'; पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची महत्वाची घोषणा

Mamata Banerjee To Support India Bloc: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. 'जर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर आमचा पक्ष या सरकारला बाहेरुन पाठिंबा देईल', अशी घोषणा त्यांनी केली आहे.
Mamata Banerjee news
Mamata Banerjee news saam tv
Published On

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. 'जर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर आमचा पक्ष या सरकारला बाहेरुन पाठिंबा देईल', अशी घोषणा त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, काही आठवड्यांपूर्वीच ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीसोबत युती नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी सांगितले होते.

ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीत असताना काँग्रेससोबत जागावाटपावर असहमती दर्शवली होती. त्या म्हणाल्या होत्या की, 'इंडिया आघाडीच्या स्थापनेत मी महत्त्वाची भूमिका बजावली होती. युतीसाठी मी नावही दिले होते. परंतु इथे पश्चिम बंगालमध्ये सीपीआय आणि काँग्रेस भाजपासाठी काम करत आहे'.

यासंदर्भातच एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले की, बंगालमध्ये सीपीआय आणि काँग्रेसवर विश्वास ठेवू नका. ते आमच्यासोबत नाही, ते येथे भाजपसोबत आहेत. ममता बॅनर्जी यांनी भाजप हा चोरांनी भरलेला पक्ष आहे, असं म्हणत भाजपवर हल्लाबोल केला. भाजप यावेळी '४०० पार' करण्याचेआपले लक्ष गाठण्यात अयशस्वी ठरेल, असंही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, 'भाजप ४०० जागा जिंकेल असा दावा करत आहे. परंतु लोक हे होऊ देणार नाही, असं सांगत आहेत. संपूर्ण देशाला समजले आहे की भाजप हा चोरांनी भरलेला पक्ष आहे. आम्ही टीएमसी सरकार बनवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीला पाठिंबा देणार आहोत. त्यांची सर्व प्रकारे मदत करु. पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही माता भगिंनीना कोणत्याही अडचणींचा सामना येऊ नये. तसेच १०० दिवस नोकरी योजनेच्या लोकांचा अडचणींना सामना करावा लागू नये, याची काळजी घेणारं सरकार आम्ही स्थापन करु'.

Mamata Banerjee news
Maharashtra Politics: प्रफुल्ल पटेलांना जिरेटोप भोवला, टीकेची झोड उठल्यानंतर पटेलांची माघार

ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, 'मी दिल्लीतील आघाडीबाबत बोलतेय. यात सीपीएम आणि बंगाल काँग्रेस समावेश नाही. आम्ही केंद्रात सरकार स्थापन झाल्यावर इंडिया आघाडीला पाठिंबा देऊ'. ममता बॅनर्जी यांनी नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा (सीएए) रद्द करण्याची शपथ घेतली आहे. 'भाजप सरकार सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि समान नागरी संहिता (UCC)ची अंबलबजावणी थांबवली जाईल', असेही त्यांनी सांगितले.

Mamata Banerjee news
Lok Sabha Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार भव्य प्रचारसभा?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com