गुडन्यूज! पेट्रोलपेक्षा २० रुपयांनी स्वस्त इंधन बाजारात; खिशालाही परवडणार

वाहनधारकांसाठी गुडन्यूज हाती आली आहे. पेट्रोलपेक्षा २० रुपयांनी स्वस्त इंधन बाजारात आलं आहे.
गुडन्यूज! पेट्रोलपेक्षा २० रुपयांनी स्वस्त इंधन बाजारात; खिशालाही परवडणार
Published On
Summary

सर्वसामान्यांना मोठा दिलासा

पेट्रोल-डिझेलला पर्यायी इंधन बाजारात

E85 इंधन पेट्रोलपेक्षा स्वस्त

पेट्रोल-डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. भारतात इंधनाच्या वाढत्या दरामुळे वाहनधारकांच्या खिशाला झळ बसू लागली आहे. या महागाईदरम्यान मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. मोदी सरकारने पेट्रोलपेक्षा २० रुपयांनी स्वस्त इंधन बाजारात आणलं आहे.

केंद्र सरकारने दिल्लीत पहिलं E85 इंधन स्टेशन सुरू केलं आहे.केंद्रीय मंत्री हरदीप सिंह यांनी दिल्लीत पहिलं ई 85 इंधन स्टेशनचं उद्घाटन केलं. E85 इंधनमध्ये ८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के पेट्रोल असते. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे कच्च्या तेलावर अवलंबून राहणे कमी होणार आहे. ई ८५ इंधनामुळे इतर देशातून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आणण्याची गरज नाही. इथेनॉल इंधन कृषि आधारित कच्च्या मालाच्या मदतीने तयार केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

गुडन्यूज! पेट्रोलपेक्षा २० रुपयांनी स्वस्त इंधन बाजारात; खिशालाही परवडणार
Petrol-Diesel Rate Rise: आठवडाभरात पेट्रोल-डिझेलची दुसऱ्यांदा दरवाढ; शेतकरी आणि सामान्यांच्या संतापाचा उद्रेक

E85 इंधनाची किंमत राजधानी दिल्लीत ८२.१२ रुपये प्रति लीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. E20 पेट्रोलपेक्षा E85 इंधन २० रुपयांनी स्वस्त असणार आहे. E20 पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल आणि ८० टक्के पेट्रोल मिश्रीत असते.

गुडन्यूज! पेट्रोलपेक्षा २० रुपयांनी स्वस्त इंधन बाजारात; खिशालाही परवडणार
महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

सध्या E85 इंधन हे सामान्य पेट्रोल वाहनांना वापरता येणार नाही. या इंधनाचा वापर करण्यासाठी विशेष वाहनांची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष वाहनांमध्ये साधारण E20 पेट्रोल आणि E85 इंधनाचा वापर करता येईल.

काय आहे सरकारचा प्लान?

काही दिवसांपूर्वी, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी म्हटलं की, सरकार दिल्ली-एनसीआर, पुणे, मुंबई नागपूरमध्ये प्रत्येकी ५० ते १०० इथेनॉल इंधन स्टेशन उभारण्याची शक्यता आहे. भारतात २०२६ सालच्या शेवटच्या महिन्यापर्यंत जवळपास ५०० हून अधिक स्टेशन उभारण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com