Mamata Banerjee : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसमोर ड्रोनच्या घिरट्या; सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, नेमकं काय घडलं?

mamata banerjee News : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसमोर ड्रोनच्या घिरट्या घातल्या. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
mamata banerjee helicopter
mamata banerjee Saam tv
Published On
Summary

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरजवळ आढळला ड्रोन

मालतीपूरमधील घटनेमुळे उडाली खळबळ

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हेलिकॉप्टरसमोर ड्रोनने घिरट्या मारल्याची घटना समोर आली आहे. ड्रोनने घिरट्या मारल्यानंतर मालतीपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवरून प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

ममता बॅनर्जी मालतीपूरमध्ये जनतेला संबोधित करण्यासाठी हेलिकॉप्टरमधून आल्या. त्यांच्या त्याच दिवशी तीन रॅली होत्या. त्यांनी आधी माणिकचकमध्ये सभेत उपस्थित जनतेला संबोधित केले. त्यानंतर मालतीपूरहून त्यांना गाजोलमध्ये तिसऱ्या रॅलीसाठी रवाना व्हायचं होतं.

प्रत्यक्षदर्शीनुसार, मुख्यमंत्री हेलिपॅडवरील हेलिकॉप्टर जवळ पोहोचल्या . त्यावेळी एक ड्रोन हेलिकॉप्टरला घिरट्या घालत होता. त्यावेळी ममता बॅनर्जी काही वेळासाठी थांबल्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, 'पोलिसांनी या ड्रोनवर लक्ष द्यावे. ड्रोन कोणाचा आहे, याचा घेतला पाहिजे. त्यांची ओळख समोर आली पाहिजे'.

mamata banerjee helicopter
फुकटच्या दारुसाठी गुंडांचा बारमध्ये राडा; कर्मचाऱ्यांना दिली जीवे मारण्याची धमकी, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

प्राथमिक चौकशीत ड्रोन नेमका कुणाचा आहे, हे समोर आलेले नाही. अधिकाऱ्यांनी अद्याप संबंधित माहिती दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तपासाला सुरुवात केली आहे.

तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अनेक अडथळे समोर आले आहेत. २६ मार्च रोजी खराब वातावरणामुळे विमान कोलकाता विमानतळावर लँडिग करण्यात अडथळे आले होते. त्यावेळी ७० मिनिटे विमानाने घिरट्या घातल्या होत्या. यावेळी फ्लाइंग क्लबमध्येही लँडिगचे प्रयत्न यशस्वी ठरले होते. त्यानंतर शेवटी दमदम विमानतळावर लँडिंग करण्यात आले होते.

mamata banerjee helicopter
Maharashtra Live News Update: खरात प्रकरण; सातपूर पोलीस ठाण्यात ६ जणांसह ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा

या व्यतिरिक्त १ एप्रिल रोजी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बरनायामध्ये रॅली झाल्यानंतर हेलिकॉप्टरला खराब वातावरणाचा फटका बसला होता. खराब वातावरणामुळे नबाग्राममध्ये हेलिकॉप्टर उतरवण्यात आलं नाही. पायलटने सुरक्षेचा विचार करून हेलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी लँडिंग केलं. त्यानंतर मुख्यमंत्री बॅनर्जी रस्ते मार्गाने निश्चित स्थळी पोहोचल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com