फुकटच्या दारुसाठी गुंडांचा बारमध्ये राडा; कर्मचाऱ्यांना दिली जीवे मारण्याची धमकी, छत्रपती संभाजीनगरमधील घटना

chhatrapati sambhaji nagar news : दोन गुन्हेगारांनी फुकटच्या दारुसाठी बारमध्ये राडा घातला. तसेचत त्यांनी कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
chhatrapati sambhaji nagar update
chhatrapati sambhaji nagar news Saam tv
Published On
Summary

चार गुंडांनी फुकट दारूसाठी बारमध्ये घातला राडा

तलवार काढून कर्मचाऱ्यांना दाखवली भीती

हॉटेलचे 14 हजारांचे बिल देण्यास दिला नकार

छत्रपती संभाजीनगरमध्ये फुकटच्या दारुसाठी दोन गुंडांनी बारमध्ये राडा घातल्याची घटना समोर आली आहे. या गुन्हेगारांनी तलवार उपसून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचेही समोर आलं आहे. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करीत १४ हजार रुपयांचं बिल दिले नाही. त्यानंतर मॅनेजरचे पैसे घेऊन हत्येची धमकी दिली.

दोन गुन्हेगार २१ मार्च रोजी रात्री १ वाजता वाळूज लिंक रोडवरील काबरू हाऊस हॉटेलमध्ये दारू प्यायला गेले होते. विकास रहाटवाडे, सारंग तरमगे असे त्यांचे त्यांचे नाव आहे. त्यांच्यासह त्यांचे दोन अन्य साथीदार घटनेनंतर पसार झाले आहेत. आरोपी विकास, सारंग आणि अन्य दोघे बारमध्ये गेले. दोघे दारूची ऑर्डर दिल्यानंतर अमराठी कर्मचाऱ्यांवरून वाद घातला.

chhatrapati sambhaji nagar update
भोंदू खरातचे काळे कारनामे संपेना! राजकीय नेत्यांना लावला लाखोंचा चुना; १ किलो मधाची बाटली ९ लाखांना विकायचा

या गुन्हेगारांनी कंबरेची तलवार काढून बारमध्ये फिरवत आरडाओरड केली. आकाश यांनी मारहाण करून खिशातील रक्कम हिसकावली. ग्राहकांना धमकावून मॅनेजरला माफी मागण्यास लावली. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. दोघेही अट्टल गुन्हेगार असून सारंग तरमगेवर यापूर्वी मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. तर विकास रहाटवाडे याने संदीप ऊर्फ गुज्जर मुळेकर याच्यासोबत मिळून १२ सप्टेंबर, २०२१ रोजी त्याचा मित्र महेश काकडे याची डोके ठेचून हत्या केली होती. काही महिन्यांपूर्वी त्याच गुन्ह्यात तो जामिनावर सुटला आहे.

chhatrapati sambhaji nagar update
Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

भुसावळमध्ये रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई

जळगावच्या भुसावळमध्ये रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई करण्यात आलीये. महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा रेल्वेमार्गे तस्करी करून नेण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आलाय. लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती.

पठाणकोट एक्स्प्रेसमधून गुटखा सदृश माल येत आहे, या माहितीच्या आधारेपठाणकोट एक्स्प्रेस भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर दाखल होताच तपासणी करण्यात आली. यावेळी जनरल कोचमध्ये एक संशयित व्यक्ती आढळून आला. या व्यक्तीकडे एकूण १७ बॅग सापडल्या. या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आढळून आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com