Trump Tariff Impacts: ट्रम्प यांनी जनेरिक औषधांवर लावला २०० टक्के टॅरिफ, भारतातील कंपन्यांवर काय परिणाम होणार?

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी 2028 पासून जेनेरिक औषधांवर 100 टक्के आणि 2029 पासून 200 टक्के टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा सन फार्मा, सिप्ला, डॉ. रेड्डीज, ल्युपिनसह भारतीय फार्मा कंपन्या आणि शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो.
Trump Tariff Impacts
Trump Tariff Impactssaam tv
Published On

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 जुलै 2026 रोजी एक मोठी घोषणा केलीये. त्यांनी सांगितलं की, अमेरिकेत येणाऱ्या सर्व जेनेरिक औषधांवर टप्प्याटप्प्याने टॅरिफ म्हणजेच अतिरिक्त आयात शुल्क लावलं जाणार आहे. त्यामुळे भारतातील सन फार्मा, ल्युपिन, सिप्ला, डॉ. रेड्डीज, अरबिंदो फार्मा अशा मोठ्या औषध कंपन्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. या निर्णयाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारातील फार्मा शेअर्सवरही दिसण्याची शक्यता आहे.

औषधांवर कधी पासून लागणार टॅरिफ

ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर ही माहिती दिली. त्यांनी म्हटलंय की, 1 ऑगस्ट 2026 पासून दोन वर्षांसाठी जेनेरिक औषधांवर कोणतेही टॅरिफ आकारलं जाणार नाही. म्हणजे 1 ऑगस्ट 2028 पर्यंत कंपन्यांना कोणतंही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही. मात्र 1 ऑगस्ट 2028 पासून या औषधांवर 100 टक्के टॅरिफ लागू होणार आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट 2029 पासून हेच टॅरिफ 200 टक्क्यांपर्यंत वाढवले जाईल.

Trump Tariff Impacts
EPFO 3.0 : खासगी क्षेत्रातील कर्मचारी असो 'गिग वर्कर' प्रत्येकाला मिळणार पेन्शन? काय आहे संपूर्ण प्लॅन

ट्रम्प यांनी सांगितलं की, हा निर्णय अमेरिकेतच औषधांचं उत्पादन वाढावं यासाठी घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जे औषध उत्पादक ठरलेल्या वेळेत अमेरिकेत स्वतःचे कारखाने आणि आवश्यक यंत्रणा उभारणार नाहीत त्यांना या जादा शुल्काचा फटका बसणार आहे.

यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने जे टॅरिफ लावले होते ते ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषधांवर लागू होते. त्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्या वेळी जेनेरिक औषधांना टॅरिफमधून सूट देण्यात आली होती कारण अमेरिकेत डॉक्टर लिहून देत असलेल्या जवळपास 90 टक्के औषधांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये जेनेरिक औषधांचाच वापर केला जातो.

याशिवाय ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेऊन ट्रेड एक्स्पान्शन अॅक्टच्या सेक्शन 232 अंतर्गत फार्मास्युटिकल उद्योगाची चौकशीही सुरू केलीये. त्याचप्रमाणे 'Trump Rx' नावाचा एक नवीन प्लॅटफॉर्मही सुरू करण्यात आलाय. या प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहकांना औषधं थेट विकण्याची सुविधा दिली जाणार आहे.

Trump Tariff Impacts
Gold Price Today : सोनं खरेदी करायचंय? थांब आधी आजचे दर पाहा! सलग तिसऱ्या दिवशी किमतीत मोठा बदल

अनेक भारतीय औषध कंपन्यांचे अमेरिकेत आधीपासूनच प्रोडक्शन फॅसिलीटीस आहेत. डॉ. रेड्डीजचे न्यू जर्सी, जॉर्जिया आणि लुईझियानामध्ये प्लांट आहेत. या ठिकाणी जेनेरिक कॅन्सरवरील औषधांपासून ते डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणाऱ्या पेनकिलर गोळ्यांपर्यंत अनेक औषधांचं उत्पादन केलं जातं.

अरबिंदो फार्माचा न्यू जर्सीमध्ये प्लांट आहे. तर सिप्लाची अमेरिकेत इनवाजेन फार्मा आणि एक्सेलन फार्मा या तिच्या उपकंपन्यांमार्फत उत्पादन आणि व्यवसाय सुरू आहे. या दोन्ही कंपन्या सिप्लाने यापूर्वी विकत घेतल्या होत्या.

Trump Tariff Impacts
Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

दरम्यान, निफ्टी फार्मा इंडेक्सने 2026 मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी या इंडेक्समध्ये सुमारे 15 टक्क्यांची वाढ झालीये. ग्लँड फार्मा, लॉरस लॅब्स, साई लाइफ सायन्सेस, अरबिंदो फार्मा, वॉकहार्ट आणि टॉरेंट फार्मा या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आतापर्यंत 30 ते 45 टक्क्यांपर्यंत वाढ झालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com