Gold Price Today : सोनं खरेदी करायचंय? थांब आधी आजचे दर पाहा! सलग तिसऱ्या दिवशी किमतीत मोठा बदल

today 24 carat gold price : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ₹१.४६ लाखांच्या पुढे गेला असून २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्याही किमती वाढल्या आहेत.
gold price today
gold price todaygoogle
Published On

latest gold price update in Mumbai Pune : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत तेजीचे सत्र सुरूच आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही सोन्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. पण सोमवारपासून सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि वाढत्या मागणीमुळे सोन्याचे दर रोज नवे उच्चांक गाठत आहेत. आजच्या दरवाढीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा १,४६,५१० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.

२४ कॅरेट सोन्याचे आजचे दर

२४ कॅरेट सोन्याचा दरात आज प्रति ग्रॅम २२९ रुपयांची वाढ होऊन दर १४,६५१ रुपये झाला आहे. त्यानुसार प्रतितोळा २४ कॅरेट सोन्याचा भाव २,२९० रुपयांनी वाढून १,४६,५१० रुपयांवर गेला आहे. तसेच १०० ग्रॅम सोन्याचा दर थेट २२,९०० रुपयांनी वाढून १४,६५,१०० रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.

gold price today
मोठी बातमी! अजित पवारांच्या जयंतीला शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार

२२ आणि १८ कॅरेट सोन्यातही मोठी वाढ

दागिन्यांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा २,१०० रुपयांची वाढ झाली असून, नवा भाव १,३४,३०० रुपये झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा दर १,७२० रुपयांनी वाढून १,०९,८८० रुपयांवर पोहोचला आहे. १८ कॅरेटच्या १०० ग्रॅम सोन्याची किंमत आता १०,९८,८०० रुपये झाली आहे.

gold price today
भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असताना बोगदा कोसळला; भूगर्भशास्त्रज्ञांसह २० जणांचा मृत्यू, ५ जण ढिगाऱ्याखाली

प्रमुख शहरांमधील सोन्याचे आजचे प्रतितोळा दर :

आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये किरकोळ फरक पाहायला मिळत आहे. दिल्ली, अहमदाबाद आणि वडोदरा येथे इतर शहरांच्या तुलनेत दर किंचित जास्त आहेत.

मुंबई:

२४ कॅरेट - ₹१,४६,५१०

२२ कॅरेट - ₹१,३४,३००

१८ कॅरेट - ₹१,०९,८८०

पुणे:

२४ कॅरेट - ₹१,४६,५१०

२२ कॅरेट - ₹१,३४,३००

१८ कॅरेट - ₹१,०९,८८०

दिल्ली:

२४ कॅरेट - ₹१,४६,५६०

२२ कॅरेट - ₹१,३४,४५०

१८ कॅरेट - ₹१,१०,०३०

अहमदाबाद :

२४ कॅरेट - ₹१,४६,५६०

२२ कॅरेट - ₹१,३४,३५०

१८ कॅरेट - ₹१,०९,९३०

चेन्नई:

२४ कॅरेट - ₹१,४६,५१०

२२ कॅरेट - ₹१,३४,३००

१८ कॅरेट - ₹१,१२,४५०

कोलकाता /हैदराबाद

२४ कॅरेट - ₹१,४६,५१०

२२ कॅरेट - ₹१,३४,३००

१८ कॅरेट - ₹१,०९,८८०

(टीप: वरील दरांमध्ये जीएसटी, टीसीएस आणि स्थानिक कर समाविष्ट नसून, प्रत्यक्ष खरेदीच्या वेळी ज्वेलर्सनुसार दरात किरकोळ फरक असू शकतो.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com