इराणच्या जहाजावर स्फोट अन् काही जण पाण्यात बुडाले; डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जगात खळबळ

Donald Trump News : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जगात खळबळ उडाली आहे. त्यांच्या पोस्टमुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Donald Trump
Donald Trump NEWSSaam tv
Published On
Summary

अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा संघर्ष भडकण्याची शक्यता

डोनाल्ड ट्रम्प यांची इराणच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट

ट्रम्प यांच्या पोस्टमुळे जगभरात खळबळ

पश्चिम आशियात अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने इराणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच्या इशाऱ्यानंतर आणखी एक मोठा इशारा इराणला दिला आहे. ट्रम्प यांनी इराणच्या जहाजावर स्फोट झाल्याचा एआय जनरेटेड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

अमेरिका-इराण दरम्यान लागू असलेल्या शस्त्रसंधीच्या काळात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वादग्रस्त पोस्ट केली आहे. ट्रथ सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधील फोटोमध्ये दिसत आहे की, इराणचा झेंडा असलेल्या जहाजावर स्फोट होताना दिसत आहे. आकाशात अमेरिकेचे ड्रोन दिसत आहे. स्फोटामुळे काही समुद्रात बुडताना दिसत आहेत'.

ट्रम्प यांच्या पोस्टमुळे दोन्ही देशामधील चर्चा संपुष्टात आल्याचे चिन्हे दिसून येत आहे. एका दिवसाआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: दोन्ही देशात शांततापूर्वक कराराबाबत चर्चा झाल्याचा दावा केला होता. या कराराला फक्त अंतिम स्वरुप देण्याचं भाष्य केलं होतं.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टनंतर भारताच्या दौऱ्यावर असलेल्या अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी नवी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, 'पुढील काही तासांच्या आत जगातून चांगली बातमी मिळेल'. मार्को रुबियो यांच्या वक्तव्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तत्पूर्वी, ट्रम्प यांनी फोटोवर 'समाप्त' (Adios) असं कॅप्शन लिहिलं आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे दोन्ही देशातील चर्चा थांबल्याचं बोललं जात आहे. परंतु वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्याकडून कोणीही अधिकृत पोस्ट करत भाष्य करण्यात आलं आहे. दोन्ही देशातील संघर्षाचा जगातील बाजारावर परिणाम होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com