Donald Trump: वॉशिंगटनच्या हॉटेलमध्ये गोळीबाराचा थरार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, थरकाप उडवणारा VIDEO

Washington Hotel Firing: वॉशिंगटन येथील हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना घडली. या हॉटेलमध्ये डिनर पार्टी सुरू असताना ही घटना घटना घडली. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीसमोरच हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघेही थोडक्यात बचावले.
Donald Trump: वॉशिंगटनच्या हॉटेलमध्ये गोळीबाराचा थरार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, थरकाप उडवणारा VIDEO
Donald Trump newsSaam Tv
Published On

Summary -

  • वॉशिंग्टनमधील हॉटेलमध्ये गोळीबार

  • डिनर पार्टीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर गोळीबार

  • गोळीबारात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले

  • हल्लेखोराने चार गोळ्या झाडल्या

अमेरिकनेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे डिनरसाठी थांबलेल्या हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले. त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या डिनर पार्टीमध्ये ही घटना घडली त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया देखील उपस्थित होत्या. त्या दोघांच्यासमोर गोळीबार झाला. हल्लेखोराने चार राऊंड फायर केले. गोळीबाराच्या आवाजान संपूर्ण हॉटेल हादरून गेले. डिनर पार्टीमध्ये सहभागी झालेले सर्वजण जीव वाचवण्यासाठी लपून बसले. या गोळीबारानंतर हल्लेखोराला पोलिसांनी पकडून त्याचा खात्मा केला.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या डिनर पार्टीदरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली. घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स हॉटेलमध्ये उपस्थित होते. गोळीबारानंतर सुरक्षा दलाने दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नाही. गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली.

डिनर पार्टीला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प या देखील उपस्थित होत्या. वॉशिंग्टनमधील पत्रकारांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला राष्ट्राध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याची ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ होती. गोळीबारानंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथआउट' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ते सुरक्षित असल्याची माहिती दिली. सिक्रेट सर्व्हिसने उत्तम काम केले असून हल्लेखोराला पकडण्यात आले आहे, असे त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून सांगितले.

हिल्टन हॉटेलमध्ये डिनर पार्टीसाठी पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. या हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्रकारांशी संवाद साधणार होते. मात्र त्याआधीच तिथे गोळीबार झाला. ट्रम्प यांच्यासमोरच गोळीबार करण्यात आला. गोळीबाराचा आवाज ऐकून डिनर पार्टीमध्ये उपस्थित असलेले सर्वजण प्रचंड घाबरले आणि टेबलखाली लपले. या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत.

Donald Trump: वॉशिंगटनच्या हॉटेलमध्ये गोळीबाराचा थरार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, थरकाप उडवणारा VIDEO
आताची सर्वात मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचं राष्ट्राध्यक्षपद जाणार? राजकीय घडामोडींना वेग

यापूर्वीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सध्या सिक्रेट सर्व्हिसने स्पष्ट केले की, या गोळीबारामध्ये डोनाल्ड ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लवकरच व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतील. ट्रम्प यांनी सिक्रेट सर्व्हिसच्या सुरक्षेतील त्रुटीला एक उत्कृष्ट कामगिरी म्हटले आहे. पण ट्रम्प उपस्थित असलेल्या हॉटेलमध्ये बंदुक घेऊन व्यक्ती कशी काय पोहोचू शकली? हे सुरक्षेचे स्पष्ट उल्लंघन आहे. हल्लेखोराचे लक्ष्य ट्रम्पच होते की नाही, याचा तपास केला जात आहे.

Donald Trump: वॉशिंगटनच्या हॉटेलमध्ये गोळीबाराचा थरार, डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, थरकाप उडवणारा VIDEO
Donald Trump tariff policy : रशियाच्या रागानं ट्रम्पच्या टॅरिफ बॉम्ब फुटला, जागतिक दबावापुढे टाटा बायबाय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com