Trump Controversy : भारत आणि चीन नरकासारखे; डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने नवा वाद

donald Trump Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीन देशाची तुलना नरकाशी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या वादग्रस्त पोस्टनंतर ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे.
Donald Trump
Donald Trump newsSaam Tv
Published On
Summary

डोनाल्ड ट्रम्प यांचं पुन्हा वादग्रक्त वक्तव्य

ट्रम्प यांची भारत, चीन देशाची नरकाशी तुलना

वादग्रस्त टिप्पणीनंतर ट्रम्प यांच्या टीकेचा भडिमार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट केली आहे. ट्रम्प यांनी भारत, चीन देशांवर वादग्रस्त पोस्ट करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणार्‍या ट्रम्प यांनी भारत आणि चीनची तुलना थेट नरकाशी केली आहे.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज एक पत्र शेअर केलं. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पत्रामुळे नवा वाद निर्माण झालाय. ट्रम्प यांनी अमेरिकेचे रेडिओ होस्ट Michael Savage यांचं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं. यात भारत, चीन आणि इतर देशांची तुलना नरकाशी केली आहे. लेखातील भाषा अपमानजनक असल्याचा दावा करण्यात येत आहे.

Donald Trump
युद्ध सुरुच राहणार, ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम नाहीच, इराणवर आणखी भीषण हल्ल्यांचा इशारा

मायकल सॅवेज यांनी पत्रात अमेरिकेच्या जन्मसिद्ध नागरिकत्व कायद्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. लेखात म्हटलं आहे की, आशियाई देशातील लोक अमेरिकेत ठरविक बाबींसाठी येतात. 'नवव्या महिन्यात अमेरिकेत बाळाला जन्म द्यायला येतात. कारण जन्मानंतर त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळते, असे लेखात म्हटलंय.

'अमेरिकेत जन्माला आलेल्या बाळाला त्वरित नागरिकत्व मिळते. त्यानंतर भारत, चीन किंवा अन्य देशातल्या नरकासमान जागेतून संपूर्ण कुटुंबाला घेऊन येतात, असे या पुस्तकात लिहिलं आहे. या विधानावरून ट्रम्प यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे.

Donald Trump
US- Iran War: 'होर्मुझमधील नाकेबंदी उठवा'; ट्रम्पची इराणला 48 तासांची डेडलाईन

तत्पूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर शेअर केलं आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी एका माध्यमाला मुलाखत देताना अमेरिकेच्या नागरिकत्वेवर भाष्य केलं होतं. ट्रम्प यांनी मुलाखतीत दावा केला होता की, 'अमेरिकेशिवाय कोणताही देश जन्माच्या आधारावर नागरिकत्व देत नाही'. परंतु अनेकांनी ट्रम्प यांचा दावा खोडून काढला आहे. 'कॅनडा, मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतही जन्माच्या आधारावर नागरिकत्व देण्याचा नियम असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com