Donald Trump-PM Modi : मोदी 'टफ मॅन'; ट्रम्प यांच्याकडून कौतुक, QUAD नेत्यांच्या बैठकीतून केली सर्वात मोठी घोषणा

Donald Trump calls PM Modi a tough man at QUAD Summit : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'क्वाड' समिटमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मोदींचे व्यक्तिमत्व खूपच कणखर आहे. त्यांच्यासोबत अमेरिकेचे चांगले संबंध आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
क्वाड समिटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं
अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला.saam TV
Published On: 

भारतासह जगातील अनेक देशांना 'टॅरिफ' ने बेजार करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोंडभरून 'तारीफ' केली. पंतप्रधान मोदी कणखर व्यक्तिमत्वाचे आहेत, असे ट्रम्प क्वाड नेत्यांच्या बैठकीत म्हणाले. मोदी हे कणखर व्यक्तिमत्व असलेले नेते असून, त्यांच्यासोबत अमेरिकेचे खूपच चांगले संबंध आहेत. क्वाडचे सदस्य असलेले देश एकत्रित सैन्य युद्ध सराव करणार आहेत, अशी घोषणाही त्यांनी केली.

ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेकडे जगातील सर्वात शक्तिशाली पाणबुड्या आहेत. पुढील १२ महिन्यांत जगाला आश्चर्याचा धक्का देणारे काम करून दाखवू. आम्ही खूपच मोठे काम करत आहोत आणि सप्लाय चेनदेखील आणखी मजबूत करणार आहोत, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

मोदी टफ मॅन

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले. मोदी खूपच टफ मॅन आहेत. जपानच्या पंतप्रधानांपेक्षाही कदाचित ते अधिक कठोर आहेत. क्वाड सदस्य देश आणि त्यांच्या नेत्यांसोबत आमचे सुरुवातीपासूनच चांगले संबंध आहेत. हे सर्व खूपच चांगले आहेत आणि सर्व माझे मित्र आहेत. त्यांच्याकडून खूप मदत मिळते, असेही ट्रम्प म्हणाले.

क्वाड सदस्य देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत ट्रम्प म्हणाले की, हे वर्ष आमच्यासाठी खूपच महत्वाचे राहिले आहे. आमच्यातील सहकार्याचे संबंध वाढले आहेत. आमची मैत्री आणखी घट्ट झाली आहे. आम्ही सगळे मित्र आहोत. यामुळे सर्व काही गोष्टी खूप सोप्या झालेल्या आहेत. हे सर्व देश जगातील काही महत्वाच्या भागीदारीचे प्रतिनिधित्व करत आहेत. आम्ही सर्व जगातील सर्वात यशस्वी देशांपैकी एक आहोत. बऱ्याच बाबतीत जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहोत. आमचे संबंध खूपच सौहार्दाचे आहेत. आम्ही सुरक्षा आणि आर्थिक कूटनीतीच्या मुद्द्यांवर एकत्रितरित्या काम करत आहोत, असेही ट्रम्प म्हणाले.

क्वाड समिटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं
खासगी आयुष्य पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर; राहुल गांधींनी सांगितला प्रेयसीसोबतच्या 'त्या' खास डेटचा अनुभव

क्वाड हे भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समूह असून, या देशांच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज, फिलीपिन्सच्या मनीला शहरात झाली. या बैठकीत ट्रम्प यांनी केलेली वक्तव्ये क्वाड सदस्य देशांमधील सुरक्षा, आर्थिक सहकार्य मजबूत करण्याच्या दृष्टीने खूपच महत्वाची मानली जात आहेत.

क्वाड समिटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं
PM Modi : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM मोदींनी दिलं आश्वासन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.