PM Modi : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! PM मोदींनी दिलं आश्वासन

PM Narendra Modi Pune News : पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासन.

पुण्यातील बहुप्रतीक्षित माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो प्रकल्पाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर उद्यापासून या मार्गावरील १७ स्थानकांवरून मेट्रोची प्रवासी सेवा प्रत्यक्ष सुरू होणार आहे. या मेट्रोमुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः हिंजवडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होईल. तसेच दररोज प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा वेळ वाचणार असून त्यांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांबाबतही महत्त्वाचे वक्तव्य केले. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी खराब हवामान आणि नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणीत आहेत. गेल्या काही वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जलसंधारणासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आले आहे. मात्र, तरीही नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या निर्माण होत आहेत, असे मोदी म्हणाले. या कठीण परिस्थितीत केंद्रातील एनडीए सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाहीही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिली. एकीकडे पुणेकरांना मेट्रोची सुविधा मिळणार असून दुसरीकडे शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारने मदतीचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.