सरकारी रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या; वैद्यकीय क्षेत्रात खळबळ

Chandigarh Doctor Suicide Case Full Details: चंदीगडमधील सरकारी रुग्णालयात २४ वर्षीय ज्युनियर रेसिडेंट डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Police and hospital authorities investigate the scene after a junior resident doctor was found dead inside a hospital trauma center in Chandigarh.
Police and hospital authorities investigate the scene after a junior resident doctor was found dead inside a hospital trauma center in Chandigarh.saam tv
Published On

चंडीगडमध्ये सरकारी कॉलेजमध्ये 24 वर्षाच्या डॉक्टरने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर योगेश यांनी हॉस्पिटलमध्ये स्वतःलाच इंजेक्शन टोचून घेतले. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली असून पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे.

Police and hospital authorities investigate the scene after a junior resident doctor was found dead inside a hospital trauma center in Chandigarh.
Crime News : अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या १५ वर्षांच्या मुलाची आईनंच केली हत्या; एक क्लू अन् हादरवून टाकणारा प्लान उघड

मिळालेल्या महितीनुसार, डॉक्टर योगेश हे जनरल मेडिसीन विभागत पीजी ज्युनियर रेसिडेंट म्हणून कार्यरत होते. त्यांनी रुग्णालयाच्या ट्रामा सेंटरमधील बाथरूममध्ये जाऊन स्वतःला इंजेक्शन लावले आणि थोड्याच वेळात त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, डॉक्टरने चार इंजेक्शन स्वतःच लावून घेतले होते. मात्र पोस्टमार्टम रिपोर्ट रिपोर्ट अद्याप आलेला नाहीये.

Police and hospital authorities investigate the scene after a junior resident doctor was found dead inside a hospital trauma center in Chandigarh.
Akola : आई-वडील घरी नसल्याची संधी साधली, ६० वर्षाच्या नराधमाकडून १० वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासन, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com