दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

From Delhi to London: दिल्लीतील आंदोलनानंतर आता थेट परदेशातही SIR प्रक्रिया आणि ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन पेटलयं.... ध्रुव राठीनं लंंडनमध्ये पुकारलेल्या आंदोलनाला नेमका कसा प्रतिसाद मिळाला? परदेशात NRIनी केलेलं हे आंदोलन कसं महत्त्वाचं ठरलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
DHRUV RATHEE LEADS LONDON PROTEST AGAINST GYANESH KUMAR | SIR ROW
DHRUV RATHEE LEADS LONDON PROTEST AGAINST GYANESH KUMAR | SIR ROWsaam tv
Published On: 

ही घोषणाबाजी भारतात नव्हे तर लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सुरू आहे...आणि ती करत आहेत भारतीय NRI..

..देशात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आणि देशातील विरोधी पक्ष आक्रमक झालेले असताना या आंदोलनाची धग थेट परदेशात पोहचलीय...युट्यूबर ध्रुव राठीनं भारतात CJPच्या आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर लंडनमध्ये ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनाची हाक दिलीय...आणि ध्रुव राठीच्या हाकेवर लंडनमध्ये हजारो भारतीय ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी एकत्र आले...

दरम्यान दिल्लीतील आंदोलनाप्रमाणेच लंडनमधील या आंदोलनालाही भारतीय नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला...परदेशात या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या ध्रुव राठीनं तिथेही आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला.

आश्चर्य म्हणजे जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशात ज्या पद्धतीनं पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली..तसा कुठलाच प्रकार लंडनमध्ये घडला नाही...की भारताचे झेंडे फडकावले म्हणून आंदोलकांवर कारवाईही झाली नाही.....मुळात 9 ऑक्टोबरला CJPच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ध्रुव राठी जर्मनीहून भारतात आला होता... मात्र, या दौऱ्यामुळे त्याच्या कायदेशीर अडचणी वाढल्याचंही पाहयाला मिळाले..

भारतात आल्यानंतर त्याला गुरुग्राममधील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिले..ध्रुव राठी भारताचा नागरिक नसल्याचे आरोप सोशल मीडियावर झाले...त्यावर आपला पासपोर्ट दाखवून त्यानं स्पष्टीकरण दिलं..त्यानंतर 2018 मधील एका जुन्या प्रकरणात कोर्टाने त्याला समन्स जारी केल्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी भर पडली. ध्रुव राठी लंडनला रवाना झाला आणि तिथूनच त्यांने ज्ञानेश कुमारांविरोधात एकत्र यायचं आवाहन केलं..दरम्यान लंडनमधील ध्रुव राठीच्या आंदोलनाला यश मिळालं असलं तरी भारतातील न्यायव्यवस्था, प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्था ज्ञानेश कुमारांविरोधात नेमकी काय भूमिका घेते? परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांच्या रोषांनंतर तरी ज्ञानेश कुमार नैतिकता म्हणून राजीनामा देऊन निष्पक्ष चौकशीला सामोरे जाणार का हा प्रश्नच आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com