अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

Maharashtra Politics: अमित शाहांच्या मुंबई दौऱ्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
Why did Devendra Fadnavis travel to Delhi ahead of Amit Shah’s Mumbai visit
Why did Devendra Fadnavis travel to Delhi ahead of Amit Shah’s Mumbai visitsaam tv
Published On: 
Summary
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

  • अमित शाह मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती

  • राज्यात आरक्षणाचा मुद्दा आणि केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वाढल्या

काही दिवसांपासून राज्यात आणि देशात वेगवेगळ्या घडामोडी सुरु आहेत. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यामुळे वातवरण तापलंय. तर केंद्रात मंत्रिमंडळाचा विस्ताराच्या हालचालींमुळे राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झालेत. विशेष म्हणजे उद्या अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे फडणवीस यांचा दिल्ली दौऱ्याला महत्त्व आलंय. उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर असून ते पत्रकार परिषदही घेणार आहेत. त्यामुळे सरकारमध्ये नेमक काय सुरूय अशी चर्चा सुरू झालीय.

Why did Devendra Fadnavis travel to Delhi ahead of Amit Shah’s Mumbai visit
राजकीय भूकंप होणार! सत्ताधारी भाजपमधील अनेक नेते पक्षाला ठोकणार 'रामराम'; बड्या नेत्याच्या काँग्रेस प्रवेशानंतर चर्चांना उधाण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांच्या घटनात्मक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून 'सेवा संकल्प अभियान' राबवले जाणार आहे. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या महीन्याभराच्या कालावधीत हे अभियान सर्व देशभरात राबविले जाणार आहे. या अभियानाची माहिती देण्यासाठी गृहमंत्री मुंबईत येणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रांताध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याबरोबरच महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मात्र फडणवीसांचा अचानक झालेला दिल्ली दौरा हा अनेकांच्या भुवया उंचवणारा ठरलाय.

Why did Devendra Fadnavis travel to Delhi ahead of Amit Shah’s Mumbai visit
अंगणवाडी सेविका-मदतनीसांसाठी मोठी बातमी! ग्रॅच्युइटीचा मार्ग मोकळा होणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

दुसरी ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आणि इतर विरोधी पक्षातील नेते दावा करत आहेत, देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या मंत्रिमंडळात असतील. पण विरोधकांच्या दाव्यांना फडणवीसांनी वेळोवेळी फेटाळून लावलेत. मात्र त्यांच्या या दिल्लीच्या फेऱ्या वाढल्यामुळे दाव्यावर शक्यतेची मोहर लागत असते. दरम्यान देशात होणारी पुढील लोकसभेची निवडणूक नरेंद्र मोदी लढवणार का? याची चर्चा आतापासूनच राजकीय वर्तृळात रंगली आहे. मोदी हेच पुढील पंतप्रधान पदाचे दावेदार असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com