राजकीय भूकंप होणार! सत्ताधारी भाजपमधील अनेक नेते पक्षाला ठोकणार 'रामराम'; बड्या नेत्याच्या काँग्रेस प्रवेशानंतर चर्चांना उधाण

Chhattisgarh Politics : छत्तीसगड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी भाजपचे अनेक नाराज नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा केला. आगामी काळात भाजपला आणखी राजकीय धक्के बसू शकतात, असेही त्यांनी म्हटले.
Chhattisgarh Politics
Deepak Baij claims many BJP leaders are in touch with Congresssaam tv
Published On
Summary
  • छत्तीसगड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी भाजपच्या अनेक नेत्यांबाबत मोठा दावा केला

  • भाजपचे अनेक नाराज नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे बैज म्हणाले.

  • आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला वेग

आगमी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल केले जात आहेत. छत्तीसगडमध्येही काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका आणि भविष्यातील राजकीय रणनीतीबाबत हालचालींना वेग आलाय. राज्यातील अनेक भाजप नेते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. बिलासपूर येथे आयोजित पक्षाच्या विभाग-स्तरीय संघटना बांधणी आणि प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी बोलताना, राज्याचे काँग्रेस अध्यक्ष दीपक बैज यांनी भाजप आणि मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्यावर जोरदार टीका केली.

Chhattisgarh Politics
Congress Internal Rift: काँग्रेसमध्ये चाललंय काय? माजी आमदारासह तब्बल २९ नेत्यांना धडाधड आल्या नोटीस, नेमकं प्रकरण आहे काय?

यावेळी त्यांनी राजकीय खळबळ उडवून देणारा दावा केलाय, भाजपचे अनेक नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा दीपक बैज यांनी केलाय. मंत्री खुशवंत साहेब यांचे मोठे बंधू धालदास यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाचा संदर्भ देत दीपक बैज म्हणाले की, ही केवळ सुरुवात आहे. भाजपचे अनेक नाराज नेते काँग्रेसच्या संपर्कात असून पक्षाला नजीकच्या काळात आणखी मोठे राजकीय धक्के बसू शकतात, असा दावा त्यांनी केला.

Chhattisgarh Politics
जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

'ढालदास' ही केवळ ट्रेलर एक आहे – बैज

दीपक बैज यांनी सांगितले की, भाजपमधील अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षात नाराज आहेत. भाजपमधील 'नाराज काका' म्हणजेच नाराज ज्येष्ठ नेते – काँग्रेसमध्ये सामील होण्याची तयारी करत असल्याचे संकेत त्यांनी दिले. बैज यांनी पुढे म्हणाले की, योग्य वेळेची वाट पाहिली पाहिजे, कारण आणखी मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

धालदास यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले की, हा केवळ एक 'ट्रेलर' आहे, नजीकच्या काळात भाजपमधील आणखी अनेकजण काँग्रेसमध्ये सामील होऊ शकतात. दरम्यान दीपक बैज यांनी भाजपचे कोणते नेते काँग्रेसमध्ये येणार आहेत, त्यांची नावे सांगितली नाहीत.

बैज यांचा मुख्यमंत्री साई यांच्यावरही निशाणा

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्यावरही भाष्य केले. मुख्यमंत्री हे 'आदिवासी' नसून 'वनवासी' आहेत, असे ते मानतात. मुख्यमंत्र्यांनी आदिवासी समाजाप्रती संवेदनशीलता दाखवली असती, तर त्यांनी 'आदिवासी दिना'निमित्त या समाजातील लोकांना शुभेच्छा दिल्या असत्या, असा आरोप बैज यांनी केला.

मुख्यमंत्र्यांबाबतच्या या विधानानंतर, राज्यातील राजकारणात भाजप आणि काँग्रेस यांच्यातील शाब्दिक चकमक पुन्हा एकदा तीव्र होत झा्लेत. काँग्रेसने सरकारची धोरणे आणि कामगिरीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत, तर भाजपने त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात निवडणूक रणनीतीबाबत चर्चा

बिलासपूर येथे आयोजित काँग्रेसचे हे प्रशिक्षण शिबिर तीन दिवस चालले. यात संघटना बळकट करणे, आगामी निवडणुकांची तयारी आणि सरकारविरोधातील आंदोलनांसाठी रणनीती आखणे या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. प्रशिक्षणादरम्यान विविध संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com