इंडिया आघाडीला मोठा झटका! एका तासाची चर्चा ठरली निष्फळ; DMk चा केंद्र सरकारला पाठिंबा

DMK's Stand on Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयकावरून राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी एम के स्टॅलिन यांची भेट घेतली. मात्र, चर्चा निष्फळ ठरल्याने इंडिया आघाडीतील मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
DMK's Stand on Delimitation Bill
DMK supports Centre on Delimitation Bill after meeting with Congress leaderssaam tv
Published On: 
Summary
  • डिलिमिटेशन विधेयकावरून इंडिया आघाडीत मतभेद

  • काँग्रेस नेत्यांनी डीएमके प्रमुख एम के स्टॅलिन यांची चेन्नईत भेट

  • डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करण्यासाठी स्टॅलिन यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न

इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय. डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करावा, भाजपचा राजकीय डाव हाणून पाडावा यासाठी मनधरणी करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधींना डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा एम के स्टॉलिन यांनी धक्का दिलाय. यामुळे भाजपसाठी ही आनंदाची बातमी आहे. इंडिआ आघाडीच्या नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर चेन्नईमध्ये पत्रकारांशी बोलताना द्रमुक (DMK) प्रमुख स्टॅलिन यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.

DMK's Stand on Delimitation Bill
एका तासाच्या बैठकीनंतर स्टॅलिन हॉटेलबाहेर पडले; काँग्रेसच्या मनधरणीला यश की अपयश?

सोनिया गांधी, खर्गे, राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी तसेच तीन मुख्यमंत्र्यांनी आज त्यांची भेट घेतली होती. स्टॅलिन यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या (डिलिमिटेशन) मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत विधेयकाविरोधात मतदान करावं अशी विनंती करत त्यांची मनधरणी केली. मात्र इंडिया आघाडीची ही बैठक निष्फळ ठरलीय. सीमांकन विधेयकावर (delimitation bill) केंद्र सरकारला पाठिंबा देतील.

DMK's Stand on Delimitation Bill
Breaking News : मोठी बातमी! शरद पवार सत्तेत कधी सहभागी होणार? शिवसेनेच्या बड्या नेत्यानं थेट तारीख सांगितली

'इंडिया' (INDIA) आघाडीच्या नेत्यांसोबत ७० मिनिटे चर्चा केल्यानंतर, डीमके ​​प्रमुख स्टॅलिन यांनी सांगितली की, त्यांच्या पक्षाकडे या विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण हे विधेयक मंजूर न झाल्यास, तामिळनाडूला सध्या मिळत असलेले संरक्षण धोक्यात येईल. दरम्यान काल डीएमकेच्या खासदारांची एक बैठक झाली होती, ज्यामध्ये पक्षाने या विषयावरील ठराव आणि पुनर्रचनेच्या संदर्भात सुरू असलेल्या संघर्षाची रूपरेषा मांडली होती, त्यांनी या सर्व बाबींची माहिती संबंधित नेत्यांना दिली.

माध्यमांशी संवाद साधताना तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सांगितले की, आमच्या चिंतांची दखल घेतली गेली असली तरी, इतर काही मुद्देही उपस्थित करण्यात आले होते. आमच्या मते, जर हे विधेयक अयशस्वी ठरले, तर तमिळनाडूचा वाटा कमी होण्याची शक्यता आहे. २०२७ मध्ये नियोजित असलेल्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या (डीलिमिटेशन) प्रक्रियेदरम्यान राज्यांच्या वाट्यात होणारी कपात रोखणे जवळजवळ अशक्य होईल, अशी भीती आहे. तमिळनाडूचे अधिकार आणि पुढील २५ वर्षांसाठीचा त्यांचा वाटा सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतलाय.

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, कारण काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने कृतीचा कोणताही पर्यायी मार्ग सुचवलेला नाही. जर हे विधेयक फेटाळले गेले, तर तामिळनाडूला सध्या मिळालेले संरक्षणही नष्ट होईल, असेही स्टॉलिन म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.