एका तासाच्या बैठकीनंतर स्टॅलिन हॉटेलबाहेर पडले; काँग्रेसच्या मनधरणीला यश की अपयश?

Rahul Gandhi Meets DMK Chief MK Stalin: डिलिमिटेशन विधेयकावरून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी चेन्नईत एम के स्टॅलिन यांची भेट घेतली. काँग्रेसच्या मनधरणीला यश आले का? स्टॅलिन आपली भूमिका बदलणार का?
Congress leaders meet MK Stalin over the Delimitation Bill
Congress leaders meet MK Stalin over the Delimitation Bill
Published On: 

डिलिमिटेशनच्या विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेस इंडिया आघाडीत एकजूट घडवून आणत आहे. एनडीए आणत असलेल्या डिलिमिटेशनला इंडिया' आघाडीतील घटक पक्ष असलेल्या डीएमकेने पाठिंबा देण्याची घोषणा केलीय.मात्र स्टॉलिन यांनी पु्न्हा त्यावर विचार करावा आणि डिलिमिटेशनला विरोध करावा यासाठी काँग्रेसकडून त्यांची मनधरणी केली जातेय. त्यासाठी राहुल गांधी, सोनिया गांधींसह काँग्रेसचे प्रमुख नेते चेन्नईला रवाना झाले. तेथे एका हॉटेलमध्ये एम. के. स्टॉलिन यांची भेट घेत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या बैठकीत स्टॉलिन यांनी आपला निर्णय बदलला का? काँग्रेसच्या मनधरणीच्या प्रयत्नांना यश आले का? याची माहिती समोर आलीय.

इंडिया आघाडीतील सहा पक्षांचे नेते, 'डीमके' प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्या चेन्नईस्थित निवासस्थानी पोहोचले आहेत. 'डीलिमिटेशन बिल'ला (मतदारसंघ पुनर्रचना विधेयक) पाठिंबा देण्याबाबत ते स्टॅलिन यांच्याशी चर्चा केली. स्टॅलिन यांनी आदल्या दिवशीच या विधेयकाला आपला पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान, शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या एका आमदाराने सांगितले की, शरद पवारही या विधेयकाला पाठिंबा देण्यास तयार आहेत. त्यानंतर सकाळी राहुल गांधींनी ट्विट करत एम के स्टॉलिन यांनी भेटण्यास जाणार असल्याची माहिती दिली होती. काँग्रेस नेत्यांसोबतची बैठक झाल्यानंतर स्टॉलिन हे आपल्या निवासस्थानी परतलेत. स्टॉलिन आणि उदयनिधी हे एकाच गाडीतून घरी निघालेत. मात्र इंडिया आघाडीचे नेते चेन्नईतील एका हॉटेलमध्ये थांबलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.