Hazrat Nizamuddin to Ghaziabad train accident update : अहमदाबादमधील विमान अपघातात २४२ जणांचा मृत्यू झाला, या दुर्घटनेमुळे देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना ताजी असतानाच दिल्लीत ट्रेन रुळावरून घसरल्याची बातमी समोर आली आहे. हजरत निजामुद्दीहून गाजियाबादला जाणारी ट्रेनचा चौथा डब्बा रूळावरून खाली घसरल्यामुळे ही दुर्घटना घडली. शिवाजी ब्रिज स्टेशनच्या जवळ हा अपघात झाला. यामध्ये अद्याप कोणत्याही जिवीतहानीही माहिती नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही ट्रेन हजरत निजामुद्दीनहून गाझियाबादकडे निघाली होती. शिवाजी ब्रिज स्टेशनजवळ ट्रेनचा चौथा डबा रुळावरून घसरला. मिळालेल्या माहितीनुसार, निजामुद्दीनहून गाझियाबाद यादरम्यान धावणारी नियमीत लोकल ट्रेन आहे.
ट्रेनच्या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. तात्काळ बचाव आणि सुरक्षा उपायांना वेग देण्यात आला आहे. रेल्वेचा डबा रुळावरून घसरल्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. उत्तर रेल्वेने या अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, सायंकाळी ४:१० वाजता डाउन मेन लाइनवर शिवाजी ब्रिजजवळ ट्रेन क्रमांक ६४४१९ (NZM-GZB EMU) चा एक डबा रुळावरून घसरला. दुरुस्तीचे काम सुरू आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी अथवा मृत झालेले नाही.
रेल्वे प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. रेल्वेला पुन्हा रूळावर घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रवाशांना घटनास्थळी मदत केली जात आहे आणि लवकरच रेल्वे वाहतूक पुन्हा सुरूळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुदैवाने या दुर्घटनेत कुणाचाही मृत्यू अथवा दुखापतग्रस्त झालेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.