Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील अपर्णा महाडिक, मैथिली पाटील यांचा समावेश

Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं AI-171 विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. विमानात २४२ प्रवासी आणि १२ क्रू सदस्य होते. १३० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
Gujarat Ahmedabad Plane Crash
Wreckage of Air India Flight AI-171 burns in Ahmedabad’s Meghani Nagar; rescue teams at work after the deadly crash that claimed over 130 lives.Saam TV News
Published On

Gujarat Ahmedabad Plane Crash : २४२ प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे विमानाला अहमदाबादमध्ये अपघात झाला. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आतापर्यंत १३० जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दोन मिनिटात विमान कोसळलं. या विमानात २३० प्रवाशांसोबत १२ क्रू मेंबर्सचा समावेश होता. यामध्ये महाराष्ट्रातील दोनजणी आहेत. अपर्णा महाडिक आणि मैथिली पाटील या त्याच एअर इंडियाच्या विमानात क्रू मेंबर्स आहेत.

दुपारी १.३८ मिनिटांनी विमानाने अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतलं. पण अवघ्या दोन मिनिटात कॅप्टन सुमित सबरवाल यांचा एटीसीसोबतचा संपर्क तुटला. ७०० फुटावरून विमान अहमदाबादमधील सरकारी रूग्णालयावर कोसळलं. अद्याप या दुर्घटनेतील मृताचा अधिकृत आकडा समोर आला नाही. रिपोर्ट्सनुसार, १३० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. या दुर्घटनेतील मृताची आकडा जास्त असू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द कर गुजरातला तात्काळ रवाना झाले आहेत. दुसरीकडे काही काळासाठी अहमदाबाद विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे.

Gujarat Ahmedabad Plane Crash
Plane Crash: २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; अहमदाबादमधील थरकाप उडवणारा व्हिडिओ

अपघातग्रस्त विमानाच्या क्रू मेंबर्समध्ये महाराष्ट्रातील दोन जणींचा समावेश होता. त्यामध्ये अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांच्या नातेवाईक असल्याचे समजतेय. अपर्णा महाडिक या रायगड जिल्ह्यातील आहेत.

विमानातील क्रू मेंबर्सची नावे -

क्लाईव्ह कुंदर-फर्स्ट ऑफिसर

सुमित सबरवाल

अपर्णा महाडिक

श्रद्धा धवन-केबिन एक्झिक्युटिव्ह 1

दीपक पाठक-केबिन एक्झिक्यूटिव्ह 2

इरफान शेख

नंथेम सिंगसेन

मैथिली पाटील

मनीषा थापा

Gujarat Ahmedabad Plane Crash
Plane Crash : विमानाचा सांगाडा, जिकडे तिकडे कोळसा अन् धूर, अहमदाबाद विमान अपघाताचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

अहमदाबाद येथे एअर इंडियाचे फ्लाइट AI-171 (बोइंग 787-8 ड्रीमलाइनर) विमान लंडनला जात असताना टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांत मेघानीनगर परिसरात कोसळले. विमानात २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स, एकूण २४२ जण होते, यात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून, १०० हून अधिक मृतदेह सापडले आहेत. एनडीआरएफ आणि बीएसएफच्या टीम बचावकार्य करत आहेत. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही या विमानात समावेश असल्याची शक्यता आहे. हादरविणाऱ्या या घटनेमुळे देशभरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com