Plane Crash : विमानाचा सांगाडा, जिकडे तिकडे कोळसा अन् धूर, अहमदाबाद विमान अपघाताचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Ahmedabad Airport Plane Crash: अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. टेकऑफनंतर काही सेकंदांतच विमान कोसळले. विमानात २४२ प्रवासी होते. अपघातानंतर परिसरात धूर आणि कोळशाचे लोट पसरले.
AIR INDIA FLIGHT AI-171 CRASHES IN AHMEDABAD WITH 242 ONBOARD
“Wreckage in flames after Air India flight crashes in Ahmedabad’s Meghani Nagar; black smoke engulfs residential area.”ANI
Published On

Gujrat Ahmedabad Plane Crash viral Video : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळल्याची भयंकर घटना घडली आहे. अहमदाबादहून निघालेले विमान काही सेकंदाच कोसळले. विमानात २४२ प्रवासी होते, त्यामध्ये दोन पायलट, १० केबिन क्रू यांचा समावेश होता. टेक ऑफ केल्यानंतर ७०० फुटांवरून विमान कोसळलं, त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत अनेकजणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अपघातानंतरचे भयावह फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. जिकडे तिकडे धूर आणि कोळसा दिसत आहे.

अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. ७०० फूटांवरून विमान कोसळल्यामुळे मोठी हाणी झाली आहे. विमानाचा सांगडा जळताना दिसत आहे. विमानातील सामान अन् इतर काही गोष्टींचा कोळसा झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप उडाला.

AIR INDIA FLIGHT AI-171 CRASHES IN AHMEDABAD WITH 242 ONBOARD
Plane Crash: २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; अहमदाबादमधील थरकाप उडवणारा व्हिडिओ

एअर इंडियाचे बी787 विमान VT-ANB, उड्डाण क्रमांक AI-171 साठी अहमदाबादवरून गॅटविकला उड्डाण केल्यानंतर लगेचच अपघातग्रस्त झाले. विमानात 242 प्रवासी होते, ज्यात 2 वैमानिक आणि 10 केबिन क्रू यांचा समावेश होता. विमानाची कमान कॅप्टन सुमीत सभरवाल यांच्याकडे होती आणि त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाइव कुंदर होते, अशी माहिती नागरी उड्डयन संचालनालय (DGCA) कडून देण्यात आली.

एअर इंडियाचे हे विमान उड्डाणानंतर 625 फूट उंचीवर पोहोचले असताना त्याचा एटीसीशी संपर्क तुटला. सिग्नल गमावल्यानंतर लगेचच विमानाचा अपघात झाला. हा अपघात झाला तेव्हा विमानाचा वेग अंदाजे 174 नॉट होता. भारतीय हवाई दल आणि लष्कर बचाव कार्य करत आहेत. विमानतळाच्या बाहेरील भिंतीजवळ ढिगारा पडला आहे. डीजीसीएने अपघाताच्या चौकशीसाठी पथक पाठवले आहे. हा अपघात अहमदाबादच्या मेघाणी नगरजवळ घडला. अहमदाबाद विमानतळापासून मेघाणीनगरचे अंतर सुमारे 15 किमी आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओत प्रचंड धूर, विमानाचा सांगडा अन् जिकडे तिकडे स्मशान शांतता दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com