

२६ वर्षीय वकिलाने आयुष्य संपवलं
हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या
राजेश सिंह असे वकिलाचे नाव
दिल्लीच्या कनॉट भागात एका हॉटेलच्या १५ व्या मजल्यावरून २६ वर्षीय वकिलाने उडी मारून आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वकिलाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. वकिलाने रविवारी रात्री सवा नऊ वाजता हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारली. राजेश सिंह असे वकिलाचे नाव आहे. वकील राजेश सायंकाळी त्याच हॉटेलमध्ये थांबले होते.
पोलिसांना वकिलाच्या आत्महत्येची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वकील राजेश सिंह हे दिल्लीतील महावीर एनक्लेवचे रहिवासी होते. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, वकील राजेश सिंह यांच्या आत्महत्या प्रकरणात आम्हाला कसलाही संशय नाही. पलिसांच्या माहितीनुसार, वकील राजेश हे एकटेच हॉटेलमधील रुममध्ये थांबले होते. त्यांनी हॉटेलमधून उडी मारल्यानंतर त्यांना उपचारासाठी लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. परंतु तेथील डॉक्टरांनी वकील राजेश सिंह यांना मृत घोषित केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी गुन्हे शाखेचे पथक देखील बोलावून घेतलं आहे. हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासणी करण्यात आली आहे. वकील राजेश सिंह यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रेमप्रकरणातून नैराश्य आलेल्या तरुणाने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना रायगडच्या अलिबागमध्ये घडले आहे. अक्षय युवराज निकाळे असे 30 वर्षीय तरुणाचे नाव आहेच. मूळचा नाशिकच्या अक्षयचे अलिबागमधील एका परप्रांतीय व्यापाऱ्याच्या मुलीसोबत दहा वर्षांहून अधिक काळ प्रेमसंबंध होते. तिन काही दिवसांपूर्वी लग्नास नकार दिला. याचा धक्का अक्षयला बसला. याच धक्क्यातून अक्षयने गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या मृत्यू प्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.