दिल्ली रेल्वे स्टेशनवर मृत्यूचं तांडव, निष्काळजीपणाचे १८ निष्पाप बळी; ऐनवेळी प्लॅटफॉर्म बदलल्यानं चेंगराचेंगरी

Delhi Railway Station Stampede : रात्री आठ वाजेनंतर दिल्लीहून प्रयागराजला जाण्यासाठी गाड्या सोडल्या जातात. यावेळी प्रशासन क्षमतेपेक्षा अधिक तिकीट विक्री केल्यानं मोठ्या संख्येनं प्रवासी हे फलाटांवर उभे होते.
Delhi Railway Station Stampede
Delhi Railway Station StampedeSaamTV
Published On

नवी दिल्ली : दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत तब्बल १८ जणांचा बळी गेलाय. महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. मात्र याला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. रेल्वेच्या कोणत्या चुकीमुळे या भाविकांना जीव गमवावा लागला? रेल्वे प्रशासनानं नेमकी काय चूक केली? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

या अत्यवस्थ पडलेल्या चपल्ला पहा. हे फाटलेले पडलेले कपडे पहा. नातेवाईकांना गमावलेल्या या भेदरलेले लोकांचे चेहरे पहा. आणि हा काळीज हेलावणारा आक्रोश ऐका. ही दृष्य आहेत देशाच्या राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्थानकाची. ही दृष्य रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाची ग्वाही देतायेत. रेल्वेच्या ढिसाळ प्रशासनानं ३ लहान लेकरांसह अनेक महिला आणि पुरुषांना जीवे मारलंय. होय याच रेल्वे प्रशासनानं त्यांचा जीव घेतलाय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण दिल्लीत रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरी १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. शेकडो प्रवासी जखमी झाले. हा अपघात नेमका कसा झाला पाहुया.

Delhi Railway Station Stampede
New Delhi Railway Station Stampede : मोठी बातमी! नवी दिल्ली स्टेशनवर चेंगराचेंगरी, महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या १५ भाविकांचा मृत्यू

दिल्ली रेल्वेस्टेशनवरील मृत्यूचं तांडव

रात्री आठ वाजेनंतर दिल्लीहून प्रयागराजला जाण्यासाठी गाड्या सोडल्या जातात. यावेळी प्रशासन क्षमतेपेक्षा अधिक तिकीट विक्री केल्यानं मोठ्या संख्येनं प्रवासी हे फलाटांवर उभे होते. त्यात दोन ट्रेन उशिरा आल्यानं त्या ट्रेनचे प्रवासी देखील फलाटावर उभे होते. त्याचवेळी 14 फलाटाच्या ऐवजी फलाट क्रमांक 12 वरुन विशेष ट्रेन सुटेल अशी घोषणा झाली आणि जमलेली गर्दी फलाट क्रमांक 12 च्या दिशेनं धावू लागली आणि त्यातच ही चेंगराचेंगरी झाली.

यामुळे मात्र रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे निघालेत. यावेळी खासदार संजय राऊत यांनी या चेंगराचेंगरीवरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. १४४ वर्षांनी महाकुंभमेळा प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर होतोय. त्यामुळे देशभरातून भाविक या प्रयागराजच्या दिशेनं मोठी गर्दी करतायेत. प्रयागराज मध्ये जाणाऱ्या सर्व रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून ट्राफिक जाम लागलाय. दिल्लीतून प्रयागराजसाठी सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेन तुडुंब भरुन जातायेत. असं असताना रेल्वे प्रशासन नेमकं काय करत होतं? या चेंगराचेंगरीवर साम टिव्हीनं काही प्रश्न उपस्थित केलेत पाहूया.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी दर तासाला जनरलची 1500 तिकिटं विकली?

कोणत्याही ट्रेनमध्ये ४ जनरल कोच असतांना ही इतकी तिकीटं का विकली?

महाकुंभाच्या काळात ट्रेन उशिरा का येत होत्या?

अचानक रेल्वेचं फलाट नेमकं का बदललं?

Delhi Railway Station Stampede
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल नवी दिल्ली सोडून दुसऱ्या मतदारसंघाच्या शोधात? विधानसभेपूर्वी काँग्रेसचा मोठा दावा

२०१३ मध्ये अशीच घटना प्रयागराज स्टेशनवर झाली होती. शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ३६ भाविकांचा मृत्यू झाला होता. तर मुंबईतही परळ रेल्वेस्थानकात अश्याच चेंगराचेंगरीचे २३ बळी गेले होते. या दोन दुर्घटनांमधून रेल्वे प्रशासनानं धडा घेण्याऐवजी कुंभकर्णा सारखं झोपलं होतं का हा प्रश्न भाविकांना पडलाय. त्यामुळे वारंवार रेल्वेचं फलाट बदलून अशा घटना घडवत यमराजाची भूमिका बजावणाऱ्या रेल्वेच्या संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन कारवाई करणं गरजेचं आहे.

Delhi Railway Station Stampede
New Delhi-Varanasi Vande Bharat Express: वाराणसी ते नवी दिल्ली, देशातील पहिली २० डब्यांची वंदे भारत ट्रेन; कसा असेल रुट? पाहा वेळापत्रक अन् तिकीटाचे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com