Mahakumbh Accident : प्रयागराजमध्ये भीषण अपघात, महाकुंभाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात, १० जणांचा मृत्यू, १९ गंभीर

Mahakumbh Road Prayagraj Accident : प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झालाय. यामध्ये १० जणांचा जागेवरच मृत्यू झालाय. तर १९ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Mahakumbh Accident
Mahakumbh Accident
Published On

Prayagraj Mahakumbh Road Accident : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये भाविकांच्या वाहनाला अतिशय भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये दहा भाविकांचा जागेवरच मृत्यू झालाय. तर १९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. जखमींवर जलच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचे काम सुरू केलेय.

Mahakumbh Accident
Mumbai Local : लोकल प्रवाशांचा सकाळ सकाळीच खोळंबा, ट्रान्स हार्बर लाईनवर बिघाड

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज मिर्जापूर हायवेवर मेजा परिसरात शुक्रवारी मध्यरात्री बोलेरो आणि बस यांची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघतामध्ये दहा भाविकांचा मृत्यू झालाय. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Mahakumbh Accident
VIDEO : ब्रँडेड तेलानेच शनिदेवाला अभिषेक करा, शनी शिंगणापूर देवस्थानचा निर्णय

मेजा परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये बोलेरो वाहनातील सर्व दहा भाविकांचा जागेवरच मृत्यू झाला. मृत भाविक छत्तीसगडमधील कोरबे येथील असल्याचे समजतेय. बोलेरोमधील सर्व १० भाविक महाकुंभात पवित्र संगम स्नान करण्यासाठी आलेले होते.

Mahakumbh Accident
Latur : लातुरात भीषण अपघात, मालवाहून ट्रक थेट खड्डयात पलटी, २ जणांचा जागीच मृत्यू

बस आणि बोलेरोच्या अपघातामध्ये १९ भाविक जखमी झाले आहेत. जखमी झालेले भाविक हे महाकुंभमेळ्यात संगम स्नान केल्यानंतर वाराणसीला निघाले होते. त्यावेळी मध्यरात्रीच काळाने घाला घातला. बोलेरो आणि बस यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. सर्व जखमींना रामनगर सीएचसी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. बसमधील जखमी भाविक मध्य प्रदेशमधील राजगढ येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

Mahakumbh Accident
Walmik Karad Gang : कराड तुरूंगात, गँग कोण चालवतंय? धनंजय देशमुखांचे गंभीर आरोप
Mahakumbh Accident
Dhananjay Munde Suresh Dhas Meet: मुंडे-धस भेटीत दडलंय काय? धसांचा मुडेंसोबत तह की देशमुखांसोबत द्रोह?

मिळालेल्या माहितीनुसार, टुरिस्ट बस आपल्या साइडनेच जात होती. पण समोर अतिशय वेगात आलेलेल्या बोलेरो गाडीने जोरदार धडक दिली. बोलेरो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासातून समोर आलेय. बोलेरोमध्ये असणाऱ्या १० जणांचा मृत्यू झालाय, त्यामध्ये चालकाचाही समावेश आहे.

Mahakumbh Accident
Pik Vima : 1 रुपयात पीकविमा बंद होणार? कृषीमंत्र्यांचे संकेत, शेतकऱ्याला टेंशन?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com