Dhananjay Munde Suresh Dhas Meet: मुंडे-धस भेटीत दडलंय काय? धसांचा मुडेंसोबत तह की देशमुखांसोबत द्रोह?

Munde-Dhas Meeting Sparks Questions: धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत नेमकं कोण काय लपवतंय? असा प्रश्न उपस्थित होतोय...कारण बावनकुळे आणि धस यांच्या माहितीत मोठी तफावत आहे.
Dhananjay Munde Suresh Dhas Meet
Dhananjay Munde Suresh Dhas Meet
Published On

Dhananjay Munde Suresh Dhas Meet: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे एकमेकांचे राजकीय वैरी असलेले मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्यात मोठ ट्विस्ट आलाय. दोघांमध्ये तब्बल साडे चार तास चर्चा झाली. ही भेट का झाली? ती कुणी घडवून आणली? भेटीत नेमकं काय झालं? हा धसांचा तह आहे की द्रोह ? यावरचा हा विशेष रिपोर्ट....

ऐकलंत....काही दिवसांपूर्वी आकाच्या आकाला थेट जेलवारीची तयारी करण्याचा इशारा देणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी मुडेंसोबत तह केल्याची चर्चा रंगलीय. आणि ही काही कोणत्या विकासकामांसाठी किंवा मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्य़ा चर्चेसाठी भेट नव्हती....तर धस थेट मुंडेंच्या घरी जाऊन त्यांना भेटले...आणि थोडं थोडकं नव्हे तर साडे चार तास मॅरेथॉन चर्चा या भेटीत झाली....आणि या भेटीचे साक्षीदार आहेत ते म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळे.....तर ते आजारी असल्यानं त्यांना भेटलो...मात्र चार तासांच्या भेटीबाबत बावनकुळेंनाच विचारा असं सांगत धसांची चीडचीड झाल्याचं दिसलं....

Dhananjay Munde Suresh Dhas Meet
GBS News : मेंदू आजाराचे थैमान; मुंबई, पुण्यानंतर नागपूरमध्ये जीबीएसने घेतला बळी

धनंजय मुंडेंच्या भेटीबाबत नेमकं कोण काय लपवतंय? असा प्रश्न उपस्थित होतोय...कारण बावनकुळे आणि धस यांच्या माहितीत मोठी तफावत आहे. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे थेट भाजप प्रदेशाध्यक्ष यात मध्यस्थी करत असल्याचंच पुढं आल्याच दिसतं. मात्र या भेटीमुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालंय. धस क्षमाशील आणि संत झाल्याचा टोला आव्हाडांनी लगावलाय. तर धस मैदान देशमुखांना संकटात सोडून एवढ्या लवकर पळ काढतील असं वाटलं नव्हतं अशी टीका मनोज जरांगेंनी केलीय. मात्र आता या समेटाच्या स्टोरीची नेमकी काय कारणं आहेत तेही पाहूया...

Dhananjay Munde Suresh Dhas Meet
Crime : वहिनीला एकटं पाहून दीराचा संयम सुटला, बलात्कार केला अन्...

मुंडे-धस समेटाची कारण काय?-

फडणवीसांनी अजित पवारांवर निर्णय सोपवणे

अजित पवारांकडून धनंजय मुंडेंची खंबीरपणे पाठराखण

राष्ट्रवादी कोअर कमिटीत वर्णी लावून मुंडेंच्या प्रमोशनचा संदेश

मुंडे-धस भेटीत थेट भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचीच उपस्थिती

मनोज जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी?

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरुन न्यायासाठी भाजपचे आमदार सुरेश धसांनी रान पेटवलं आहे. धस यांनी मुंडेंचा आकाचे आका उल्लेख करत थेट जेलमध्ये पाठवण्याचा निर्धार केला होता. मात्र हे धस यांनी हे प्रकरण धसास का लावलं नाही ? मधेच त्यांना मुंडेंच्या तब्येतीची एवढी काळजी का वाटू लागली? चार तासांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.....मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे धसांचा हा मुंडेंसोबतचा तह आहे की देशमुखांसोबतचा द्रोह हे आरोपींना शिक्षा मिळणार की ते मोकाट सुटणार यावर अवलंबून असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com