Latur : लातुरात भीषण अपघात, मालवाहून ट्रक थेट खड्डयात पलटी, २ जणांचा जागीच मृत्यू

Latur Accident : लातूर - जहीराबाद महामार्गावर भीषण अपघात झालाय. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात ट्रकमधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी.
Latur Accident
Latur Accident
Published On

संदीप भोसले

Latur Accident News : लातूर जहीराबाद महामार्गावर मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल खड्ड्यात पलटी झाली. यात ट्रक मधील दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Latur Accident
Fake Certificates : धक्कादायक! चक्क ५ मिनिटात बनावट दाखला, १०० रूपयांत उत्पन्न आणि जातीचे प्रमाणपत्र

निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. संध्याकाळी सहा वाजताच्या आसपास कर्नाटकमधील (केए - ३५ सी- ९८४५) ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोघांचा जागेवर मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. लातूर जहिराबाद हायवेवर निलंगा तालुक्यातील मसलगा पाटीवर बस्वकल्याणवरून लातूरच्या दिशेने सौर उर्जेचे लोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. ट्रक रोडवरून खाली गेल्यामुळे आतमधील लोखंडी अँगल कॅबिनवर आल्याने चुराडा झाला. केबिनमधील दोघांचा जागेवर मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झालाय. घटना घडताच मसलगा येथील ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने अँगल बाजूला करून तिघांना बाहेर काढून रूग्नवाहीकेतून रूग्णालयात पाठवले.

Latur Accident
Aadhaar : आधारकार्ड बंद होणार? कागदपत्रांची कटकट कायमची संपणार? व्हायरल मसेजमागचं सत्य पाहा

मृत व्यक्तीबाबत अद्याप कुठलीही माहिती प्राप्त झाली नाही. यावेळी नागरिकांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. निलंगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पोलीस जमादार सुनील पाटील यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेची नागरिकांकडून माहिती घेतली. तसेच रोडवरील वाहतूक सुरळीत केली.

Latur Accident
Pik Vima : 1 रुपयात पीकविमा बंद होणार? कृषीमंत्र्यांचे संकेत, शेतकऱ्याला टेंशन?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com