Fire Breaking: मोठी दुर्घटना! प्रसिद्ध रेस्टॉरंटला भीषण आग, १० जणांचा होरपळून मृत्यू, २५ गंभीर जखमी

Delhi Fire News Today : दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटला भीषण आग लागून १० जणांचा मृत्यू तर २५ हून अधिक जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Delhi Fire News Today
Delhi Fire News TodaySaam TV Marathi
Published On

Delhi Malviya Nagar restaurant fire latest updates : देशाची राजधानी दिल्लीतून आगीची एक अत्यंत भयानक आणि दुर्दैवी दुर्घटना समोर आली आहे. दिल्लीतील गजबजलेल्या आणि प्रसिद्ध मालवीय नगर (Malviya Nagar) भागातील एका रेस्टॉरंटला आज भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १० जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर २५ पेक्षा जास्त जण गंभीर जखमी आहेत. या आगीमुळे रेस्टॉरंटमधून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडत असून, परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शेजारील दुकाने आणि इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आहेत. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. पण ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे.

Delhi Fire News Today
Khan Sir : मोठी खळबळ! खान सरांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटवर ६ राऊंड गोळीबार; गोळ्या लागल्या अन्... २ तासांत काय काय घडलं?

रेस्टॉरंटमध्ये अचानक उसळल्या आगीच्या ज्वाला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मालवीय नगर येथील एका इमारतीमध्ये असलेल्या रेस्टॉरंटमध्ये आज अचानक आग लागली. रेस्टॉरंटमध्ये लाकडी फर्निचर आणि ज्वलनशील साहित्य असल्यामुळे आगीने काही वेळातच अत्यंत रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाला इतक्या तीव्र होत्या की आजूबाजूच्या परिसरात धुराचे काळे साम्राज्य पसरले. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. २५ जण भाजल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Delhi Fire News Today
Rain Update : मान्सून वेगात! कोणत्याही क्षणी केरळात धडकणार; महाराष्ट्रात कधी येणार? हवामान विभागाचा मोठा अंदाज

कधी लागली आग?

आज सकाळी ९.४५ वाजताच्या दरम्यान दिल्ली अग्निशमन सेवेला (डीएफएस) या आगीबाबतचा कॉल आला. त्यानंतर अग्निशमन आणि बचाव पथकांना तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही आग सकाळी अंदाजे ८.५० वाजता लागली. दिल्ली अग्निशमन दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, जवानांनी रेस्टॉरंटच्या तळघरातून तीन जणांना बाहेर काढले आणि त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. नेहरू प्लेस अग्निशमन केंद्राचे विभागीय अधिकारी (डीओ) रवींद्र हे घटनास्थळी उपस्थित असून बचाव कार्यावर देखरेख करत आहेत.

Delhi Fire News Today
Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पाहा 3 जून रोजी किती बदलला भाव

जखमींवर उपचार सुरू.., पोलिसांनी काय सांगितले?

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीमधून ११ जखमींना बाहेर काढून वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींवर उपचार सुरू आहेत. परिसरातील इतर इमारतीही खाली कऱण्यात आल्या आहेत. एका वरिष्ठ अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, रेस्टॉरंटमधील आग विझवण्यासाठी १० अग्निशमन गाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, तरीही इमारतीत कोणी अडकले आहे का हे तपासण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शोध आणि बचाव कार्य सुरूच होते.

Delhi Fire News Today
TMC split : 'त्या' राज्यातही महाराष्ट्र पॅटर्न! २ तृतीयांश आमदार-खासदार फुटल्याचा दावा; राजकारणात मोठी खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com