Sonam Wangchuk : '....तरच मी उपोषण मागे घेईन', सोनम वांगचुक यांचा इशारा, सरकारपुढे ठेवल्या 'या' तीन अटी

Delhi Sonam Wangchuk Hunger Strike Update : नीट पेपरफुटी प्रकरणावर २२ दिवसांपासून उपोषण करणारे सोनम वांगचुक यांनी सरकारसमोर तीन महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य झाल्यास उपोषण मागे घेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
SONAM WANGCHUK SETS THREE CONDITIONS TO END HUNGER STRIKE OVER NEET PAPER LEAK CASE
SONAM WANGCHUK SETS THREE CONDITIONS TO END HUNGER STRIKE OVER NEET PAPER LEAK CASESaam Tv
Published On
Summary
  • सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके गेल्या २२ दिवसांपासून जंतरमंतर येथे उपोषण करत आहेत

  • पोलिसांनी सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले

  • वांगचुक यांनी उपोषण मागे घेण्यासाठी सरकारसमोर तीन अटी ठेवल्या आहेत

  • नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेत चर्चा व्हावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे

Delhi Sonam Wangchuk Hunger Strike Update News महाराष्ट्रात नीट पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणात अनेक मासे गळाला लागले. मात्र या सगळ्यामध्ये प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालं. या प्रकरणानंतर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक हे गेले २२ दिवस दिल्लीच्या जंतर मंतरवर उपोषण करत आहेत. दरम्यान शनिवारी पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्ती पोलिसांनी दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात नेले. त्यानंतर आता वांगचुक यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य केल्यास वांगचुक यांनी उपोषण सोडण्याची ग्वाही दिली आहे.

सोनम वांगचुक यांच्या काय आहेत अटी?

सोनम वांगचुक यांनी आज सकाळी सोशल मीडियावर ट्विट करत, उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्यांनी सरकारसमोर तीन अटी ठेवल्या आहेत.

  1. केंद्र सरकारने नीट परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी घ्यावी.

  2. जर मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ देण्यात आले आणि तेथील खासदारांनी आम्हाला नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले तर मी आमरण उपोषण मागे घ्यायला तयार आहे.

  3. तसेच, जर माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आले नाही तर खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात येऊन मला वरील सर्व गोष्टींबाबत आश्वासन द्यावे.

SONAM WANGCHUK SETS THREE CONDITIONS TO END HUNGER STRIKE OVER NEET PAPER LEAK CASE
New Bride Ritual : आषाढ महिन्यात नवविवाहितेला माहेरी का पाठवतात? काय आहे परंपरा

सरकार काय निर्णय घेणार?

दरम्यान आज पासून संसदीय आधिवेशनला सुरुवात होत असून या अधिवेशनात नीट पेपर फुटी प्रकरणावर, तसेच वांगचुक यांनी घातलेल्या अटींवर काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. रविवारी अनेक ठिकाणी CJP समर्थकांनी आंदोलन केले.

दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर पोलिसांचा बंदोबस्त

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर जंतरमंतरवरील आंदोलनाची तीव्रता कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषण सुरू ठेवल्याने आंदोलनाला नवे बळ मिळाले आहे. याशिवाय, वांगचूक यांना पोलिसांनी ताब्यात घेतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने देशभरातून आंदोलनाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून जंतरमंतर परिसरात पोलिसांची हालचाल वाढली असून वॉटर कॅनन, वज्र वाहने आणि दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. बॅरिकेड्स हटविणे आणि काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाल्यामुळे आंदोलकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com