Delhi Crime News: राजधानी दिल्लीत महिला सुरक्षेचा बोजवारा; मध्यरात्री पहिल्या महिला रिक्षा चालकावर विटा-दगडांनी हल्ला

Delhi Crime News: राजधानी दिल्लीत सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याच दिल्लीमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे.
Delhi Crime News
Delhi Crime NewsSaam tv
Published On

Delhi Crime News :

राजधानी दिल्लीत सातत्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याच दिल्लीमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीतील पहिल्या महिला रिक्षा चालकावर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यात आला आहे. सुनीता चौधरी असं या रिक्षा चालकाचं नाव आहे. या घटनेमुळे दिल्लीत खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

'एबीपी न्यूज'च्या वृत्तानुसार, दिल्लीच्या सुनीता चौधरी या गेल्या 20 वर्षांपासून रिक्षा चालवून कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात. 43 वर्षीय सुनीता चौधरी या मालवीय येथील रहिवासी आहेत. 23 सप्टेंबरच्या मध्यरात्री सुनीता यांना मुनीरका येथून महरौली बस स्टँडपर्यंत एका प्रवाशाला घेऊन जायचे होते. याच दरम्यान ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Delhi Crime News
Chandrapur Crime News : रुग्णाच्या नातेवाईकाकडून डाॅक्टरांना मारहाण, चंद्रपूरात दाेघांना अटक

सुनीता चौधरी यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं की, 'महरौलीकडे जाताना त्यांच्या रिक्षाला एकाने रिक्षाचालकाने धडक दिली. यामुळे त्यांचा रिक्षाचालकाशी वाद झाला.यानंतर सुनीता यांनी या फोनवरून त्यांची तक्रार पोलिसांत दिली. या भांडणाची तक्रार पोलिसांना दिल्याने हा रिक्षाचालक भडकला. त्याने थेट सुनीता चौधरी यांच्यावर दगडफेक केली'.

'या हल्ल्यात सुनीता जखमी झाल्या. घटनेच्या वेळी बरेच लोक होते, परंतु कोणीही हा वाद सोडविण्याचा प्रयत्न केला नाही. त्यात वारंवार पोलिसांना फोन करूनही पोलीस घटनास्थळी पोहोचले नाहीत, असंही त्या म्हणाल्या.

सुनीता चौधरी यांचा आरोप आहे की ,'पोलिसांना 23 सप्टेंबरच्या मध्यरात्री मदतीसाठी फोन केला होता. पण पोलीस घटनास्थळी पोहचले नाहीत. मी रात्रभर पोलिसांच्या मदतीची वाट पाहिली. त्यावेळी 15 पेक्षा जास्त वेळा पोलिसांना फोन केला. त्यानंतर कुठे पोलीस आले.

'ते मला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. मी पोलीस ठाण्यात झालेल्या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले , असे त्या पुढे म्हणाल्या.

Delhi Crime News
Chalisgaon Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीकडून निर्घृण हत्या

तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांना आरोपी रिक्षा चालकाची ओळख पटली आहे. दिल्ली पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यासाठी शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे दिल्लीतील महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com