
प्रेम ही जगातील सर्वांत सुंदर आणि हृदयस्पर्शी भावना आहे. प्रेमामध्ये निस्वार्थता, आपुलकी आणि एकमेकांविषयीची जाणीव असते. पण हेच प्रेमाचे नातं जेव्हा विषारी होतं, त्यावेळी जोडीदार जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही. टॉक्सिक रिलेशनशीपमध्ये प्रेम बाजूला राहतं अन् जोडीदारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होतो. त्यामधूनच शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातो, त्यामुळे अनेकदा जीव घेतला जातो. दिल्लीमध्ये ३ तरूणींचा टॉक्सिस रिलेशनशीपमधून खून झाल्याची घटना घडली आहे.
२१ वर्षीय कोमल, १९ वर्षीय विजयलक्ष्मी आणि १८ वर्षीय मेहक जैन यांच्या हत्येनं राजधानी हादरली. असुरक्षित भावना मनात असल्यामुळे जोडीदाराने कोमल हिचा गळा दाबून खून केला अन् मृतदेह कालव्यात टाकला. दिल्लीमधील छावणी परिसरात चाकूने विजयलक्ष्मी हिला जोडीदाराने चाकूने भोसकून ठार केले. तर मेहक हिला प्रियकराने आधी चाकूने भोसकून जीव घेतला अन् नंतर मृतदेह जाळला. कोमल, विजयलक्ष्मी अन् मेहक यांच्या जोडीदाराच्या मनात सतत संशय असायचा. इतर मुलांसोबतही त्या प्रेमाच्या नात्यात असल्याचा संशयाचा भुंगा डोक्यात भुणभुण करत होता. त्यामुळे त्यांच्या मित्र-मैत्रिणीच्या सोशल मीडिायवरही आरोपी बॉयफ्रेंडनी पाळत ठेवली होती. त्यांच्या मनात द्वेष वाढत गेला अन् त्यामधूनच जीव लावणाऱ्या गर्लफ्रेंडचा निर्घृणपणे जीव घेतला.
कोमल, मेहक असो की विजयलक्ष्मी तिघींचा खून करणारे तिन्ही आरोपी टॉक्सिस झाले होते. या प्रत्येक प्रकरणात आरोपींची मनोविकृती, मत्सर, नियंत्रण आणि जोडीदार गमावण्याची भीती मनामध्ये दबा धरून बसली होती. त्यामुळेच प्रेमाचे नातं टॉक्सिस झालं अन् जोडीदाराचाच जीव घेतला असं पोलिसांच्या तपासात समोर आलेय. इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे आरोपीच्या डोक्यात सैतान घुसला. आरोपींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून गर्लफ्रेंडवर पाळत ठेवली. त्यांनी मुलींना ऑनलाइन इतर मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींशी संवाद साधताना पाहिले तेव्हा संतापले. तिने मला धोका दिला? ही भावना डोक्यात गेली अन् सूडापोटी आरोपींनी प्रेयसीची निर्घृण हत्या केली.
सोशल मिडियावर मिळणारे तात्काळ समाधान आणि सततचा संपर्क, यामुळे नातं विषारी होतं. सोशल मीडियावरील सततचा संपर्क यामुळे अनेकांच्या मनात संशयाची बिजं पेरली जातात अन् वेडापिसा प्रवृत्तींना चालना मिळते, असे पोलिसांच्या तपासात समोर आलेय.
मानोसपचार तज्ज्ञांनी सांगितले की, अति हव्यासीपणा एखाद्याचा मनात अति प्रमाणात रूजतो, त्याचवेळी नात्यात असुरक्षितताही जन्म घेते. प्रेमामध्ये विश्वासाचा अभाव तयार झाला की नातं विषारी होतं. त्याला सोशल मिडिया हेही एक मोठं कारण आहे. सोशल मीडियावर अनेकदा ज्या गोष्टी नाहीत, त्या टाकल्या जातात त्यामुळे गैरसमज निर्माण होतात अन् संबंध विखुरले जातात. मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सोशल मीडिया हे तरुण जोडप्यांमध्ये हव्यासीपणा आणि हिंसाचार वाढण्याचे कारण आहे. सोशल मीडियातील अतिवापर आणि संशयी वृत्ती, अवास्तव अपेक्षा,विनाकारण चीडचीड, आक्रमकता, नियंत्रणात ठेवण्याची वृत्ती आदीमुळं तरूण जोडप्यांमधील नात्यात हिंसकपणा वाढत जातो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.