
दिल्ली एनसीआरमध्ये मुसळधार वादळ आणि पावसामुळे हवामान बदलले. वादळाची तीव्रता पालम परिसरात सर्वात जास्त होती. पालम परिसरात वादळ ताशी ९६ किलोमीटर वेगाने वाहत होते. या वादळाचा परिणाम हवेत उडणाऱ्या इंडिगोच्या एका विमानावरही झाला. वादळामुळे रायपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सचं विमान आकाशातच अडकलं. या विमानाचा व्हिडिओ व्हायरल झाले आहे.
जोरदार वादळामुळे विमानाचं लॅडिंग करण्यास अडचण निर्माण झाल्यानं विमानाला आकाशातच घिरट्या घालाव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांच्या मनात भीती भरली. या विमानातील घाबरलेल्या प्रवाशांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. रायपूरहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान क्रमांक 6E 6313 हे धुळीच्या वादळामुळे अडकले. विमानतळावर लॅंडिंग करता आले नसल्यानं विमानाला आकाशातच घिरट्या माराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
यानंतर, हवेत अनेक वेळा प्रदक्षिणा घालल्यानंतर विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. यासंबंधीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये, पायलटला असे म्हणताना ऐकू येते की वाऱ्याचा वेग ताशी ८० किमी पर्यंत होता आणि त्यामुळे विमान उतरवण्यात अडचणी येत होत्या. काही वेळाने विमान सुरक्षितपणे उतरले.
दिल्ली विमानतळ प्रशासनाला याची माहिती मिळताच सर्व आपत्कालीन सेवांना सतर्क करण्यात आले. पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी) ला त्याच्या परिस्थितीची माहिती दिली, त्यानंतर एटीसीने विमान पुन्हा धावपट्टीवर उतरवले. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, पालम परिसरात वादळी वाऱ्यांचा वेग ताशी ९६ किलोमीटर नोंदवण्यात आला. प्रगती मैदान येथे वाऱ्याचा कमाल वेग ताशी ८१ किमी आणि सफदरजंग येथे ताशी ८० किमी होता.
रविवारी आलेले वादळ गेल्या ३० दिवसांतील सर्वात तीव्र होते. यापूर्वी २५ मे रोजी वाऱ्याचा वेग ताशी ८२ किलोमीटरपर्यंत नोंदवण्यात आला होता. आधीच्या अहवालांमध्ये वाऱ्याचा वेग कमी होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.