आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये दंड थोपटले आहेत. विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून आम आदमी पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत या दोन्ही जागा आम आदमी पक्ष जिंकेल, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ते गुजरातमध्ये माध्यमांशी बोलत होते. (Latest Marathi News)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज गुजरातच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी माध्यमांशी संवाद साधताना आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठं भाष्य केलं. केजरीवाल म्हणाले,'मागच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत गुजरातमधील लोकांचा चांगला पाठिंबा मिळाला होता. मतदारांकडून खूप प्रेम मिळालं. आम्हाला त्यावेळी १४ टक्के मते मिळाली. गुजरातमध्ये आमचे ५ आमदार आहेत'.
'इंडिया आघाडीकडून आम्हाला गुजरातमध्ये भावनगर आणि भरुच या दोन जागा मिळाल्या आहेत. आमचे उमेदवार मजबूत आहेत. आम्हाला आशा आहे की, मतदार आमच्या दोन्ही उमेदवारांना निवडून देतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला.
'गुजरातमध्ये भाजपचे २६ खासदार आहेत. त्यांनी गुजरातमधील लोकांसाठी काहीच केलं नाही. त्यांनी गुजरातच्या लोकांसाठी आवाज उचलला नाही.. ते फक्त भाजपचे गुलाम म्हणून राहतात. आमचे दोन्ही खासदार गुजरातच्या लोकांची बाजू संसदेत मांडतील. लोकांसाठी कामही करतील, असे ते पुढे म्हणाले.
दरम्यान,आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. आम आदमी पक्षाने गुरुवारी पंजाबमध्ये पहिली यादीत आठ उमेदवारांची घोषणा केली. आपने तिकीट दिलेले काही उमेदवार हे आमदार आणि मंत्री आहेत. दिल्लीच्या पार्श्वभूमीवर आपने पंजाबमध्ये लोकसभेला आमदारांना निवडणुकीच्या मैदानात उभं केलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.