एक अत्यंत संतापजनक प्रकार घडलेला आहे. येथील डांगेला परिसरात एका 24 वर्षीय महिलेच्या स्कूटरला आग लागल्याने आगीत होरपळून तिचा मृत्यू झाला. महिला आगीच्या विळख्यात सापडली तेव्हा तिथे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मात्र इतकी लोक असूनही कोणीही या महिलेची मदत करण्यासाठी पुढं आलं नाही. उलट अनेक लोक या घटनेचा व्हिडीओ शूट करत होते.
या घटनेचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. आता उत्तराखंडमधील टिहरी गढवाल जिल्ह्यातील पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रंजना असं मृत महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजना ही उत्तरकाशी शहरातील चिन्यालीसौर भागातील रहिवासी होती. जिथे ती एका फार्मसीमध्ये काम करत होती. ती डेहराडूनहून चिन्यालिसौरला जात असताना तिच्या स्कूटरने पेट घेतला. (Latest Marathi News)
'टाइम्स ऑफ इंडिया'ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ''या महिलेला मदत करण्या ऐवजी अनेक लोक तिचे व्हिडीओ शूट करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी थांबले होते. आम्हाला सोशल मीडियावर या घटनेचे काही व्हिडीओही सापडले आहेत.''
पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितलं की, ''आम्ही काही लोकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी केली. मात्र त्यांचं म्हणणं होतं की, ते तिला मदत करू शकत नाहीत, कारण तीच शरीर 80 टक्के भाजलं होतं. यातच पोलिस रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.''
घटनास्थळापासून 2 किमी अंतरावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फूटजमध्ये ही महिला कोणत्याही अडचणीशिवाय तिच्या स्कूटरवरून जाताना दिसली होती. तिच्या वाहनाला काही विद्युत बिघाडामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाजही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.