IMD Weather Alert: सावधान! परत आणखी एक चक्रीवादळ येतंय; 'या' राज्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस

Weather Update: बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, यामुळे आणखी एक चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशसह अनेक भागांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Cyclone Alert: Bay Of Bengal Low Pressure Area, Heavy Rain Warning In Several States
Cyclone Alert: Bay Of Bengal Low Pressure Area, Heavy Rain Warning In Several Statessaam tv
Published On: 
Summary
  • ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

  • बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळाची ताजी माहिती

  • हवामान विभागाचा चक्रीवादळ आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज

बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेट आणि अंदमान समुद्राच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेला सरकण्याची आणि त्याचे रूपांतर 'डिप्रेसन'मध्ये (कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात) होण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत ते अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

बंगालच्या उपसागरासह अंदमान आणि निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेला सरकण्याची आणि त्याचे रूपांतर 'डिप्रेसन'मध्ये (कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात) होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, उद्यापर्यंत ते अधिक तीव्र होऊन त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल.

Cyclone Alert: Bay Of Bengal Low Pressure Area, Heavy Rain Warning In Several States
Maharashtra Weather Update : पुणे-नाशिकला पावसाने झोडपलं, जिकडे तिकडे पाणीच पाणी; शनिवारी पावसाची काय स्थिती?

सुमारे २ नोव्हेंबरच्या सुमारास, हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ, पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचेल. या चक्रीवादळामुळे हवामानात वेगाने बदल होऊन अनेक राज्यांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार या प्रणालीमुळे २ नोव्हेंबर रोजी किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि यानम भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडेल, तर ३ नोव्हेंबर रोजी तिथे खूप मुसळधार पाऊस होईल. यासह २ आणि ३ नोव्हेंबर रोजी रायलसीमा भागात, तसेच ३ आणि ४ नोव्हेंबर रोजी ओडिशामध्ये खूप मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

Cyclone Alert: Bay Of Bengal Low Pressure Area, Heavy Rain Warning In Several States
Rain Alert: परतीच्या पावासाचा तडाखा, कोकण अन् मध्य महाराष्ट्राला झोडपून काढणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण भारतात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान केरळ आणि माहेमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी आणि ३ ते ४ नोव्हेंबर दरम्यान लक्षद्वीपमध्ये १ ते ६ नोव्हेंबरला किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम, किनारपट्टीवरील कर्नाटक, रायलसीमा आणि तेलंगणामध्ये ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर आणि पुन्हा ४ ते ६ नोव्हेंबर तसेच उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक भागात ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर आणि ५ ते ६ नोव्हेंबर दरम्यान पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.

२ ते ४ नोव्हेंबर दरम्यान, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमा भागांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्येही २ ते ३ नोव्हेंबर दरम्यान अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. यासह १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान केरळ, माहे, उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमा आणि तेलंगणामध्ये ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर आणि ४ नोव्हेंबर रोजी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.