Maharashtra Weather Update : पुणे-नाशिकला पावसाने झोडपलं, जिकडे तिकडे पाणीच पाणी; शनिवारी पावसाची काय स्थिती?

Maharashtra rain update today : पिंपरी-चिंचवड, खेड, शिरूर, नाशिकच्या चांदवड आणि ठाणे परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. खेड-शिरूरमधील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी दिलासा मिळण्याची आशा आहे, तर चांदवडमध्ये उरलेली पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे.
Heavy Rain Hits Several Parts of Maharashtra
Maharashtra Today Weather Update NewsSaam tv
Published On: 

Heavy Rain Hits Several Parts of Maharashtra : पिंपरी चिंचवड, खेड, शिरूरसह नाशिकमध्ये संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. तर ठाण्यामध्ये सकाळी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. 'अर्णब' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ठाण्यासह पिंपरी-चिंचवड आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू झाला. कुठे नागरिकांची तारांबळ उडाली आहे, तर कुठे बळीराजाच्या चिंता वाढल्या आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये अचानक आलेल्या पावसाने उडवली तारांबळ

पिंपरी-चिंचवड शहरात आज अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास कोसळलेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली. या पावसामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Heavy Rain Hits Several Parts of Maharashtra
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण दुर्घटना! उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा दुर्दैवी मृत्यू, एक गंभीर

खेड-शिरूरमध्ये रब्बी पिकांना संजीवनी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दुसरीकडे, पुण्यातील खेड आणि शिरूर तालुक्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कडाक्याचे ऊन आणि पाण्याच्या टंचाईमुळे संकटात सापडलेल्या कांदा लागवड, भाजीपाला (तरकारी) आणि जनावरांच्या चाऱ्याच्या पिकांना या पावसामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. रब्बी हंगामातील पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

Heavy Rain Hits Several Parts of Maharashtra
लंडनला एमबीए करायला गेलेली तरुणी अचानक गायब; पिंपरीत बंद फ्लॅटमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

नाशिकच्या चांदवडमध्ये चिंता वाढली; उरले-सुरले पीक धोक्यात

पुणे आणि ठाण्यात पावसाने दिलासा दिला असला, तरी नाशिकच्या चांदवड परिसरात मात्र पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. चांदवडमध्ये सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे शेतात उभे असलेले आणि काढणीला आलेले पीक पुरते धोक्यात आले आहे. हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

'अर्णब' चक्रीवादळाचा फटका; ठाण्यात ढगाळ वातावरण अन् सोसाट्याचा वारा

हवामान खात्याने ५ राज्यांना दिलेल्या 'अर्णब' चक्रीवादळाच्या इशाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसून येत आहे. ठाणे शहरात दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. सोसाट्याचा वारा आणि हवेतील गारव्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या ठाणेकरांना दिलासा मिळाला असला, तरी अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील नागरिकांची धावपळ झाली.

शनिवारी कुठे कुठे पावसाचा अंदाज?

हवामान विभागाने पुढील २४ तासांत राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी पुणे घाटमाथा, पुणे, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सांगली, नाशिक घाटमाथा, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज असून उर्वरित राज्यात तापमानात चढ-उतार सुरूच राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.