Fuel Shortage : एकही थेंब इंधन नाही, 'या' देशात पेट्रोल डिझेलचं मोठं संकट; वीज पुरवठाही खंडित

Cuba Havana Fuel Crisis News : क्युबामध्ये इंधन तुटवड्यामुळे गंभीर वीज संकट निर्माण झाले आहे. हवानासह अनेक शहरांमध्ये २० ते २२ तास वीज नसल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
CUBA FACES SEVERE POWER AND FUEL CRISIS WITH 22-HOUR BLACKOUTS
CUBA FACES SEVERE POWER AND FUEL CRISIS WITH 22-HOUR BLACKOUTSSaam Tv
Published On
Summary
  • क्युबामध्ये इंधन तुटवड्यामुळे वीज संकट तीव्र झाले आहे

  • हवानामध्ये दररोज २०–२२ तास वीज कपात होत आहे

  • नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत आहे

  • सौरऊर्जेची वाढ असूनही परिस्थिती सुधारलेली नाही

CUBA FACES SEVERE POWER AND FUEL CRISIS WITH 22-HOUR BLACKOUTS क्युबा हा देश सध्या इंधन आणि वीज संकटाचा सामना करत आहे. देशातील डिझेल आणि इंधन तेलाचा साठा जवळजवळ संपल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. याचा थेट परिणाम राजधानी हवानासह अनेक शहरांवर होत असून, नागरिकांना वीजविना राहावे लागत आहे. गेल्या अनेक दशकांतील हे सर्वात भीषण वीज आणि इंधन संकट मानले जात आहे.

क्युबाचे ऊर्जा मंत्री व्हिसेंटे दे ला ओ यांनी स्पष्ट केले की, “आमच्या देशाकडे वीज निर्मितीसाठी आवश्यक इंधन उपलब्ध नाही, त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवणे मोठे चॅलेंज बनले आहे,” असे त्यांनी सांगितले. या गंभीर परिस्थितीमुळे हवानामध्ये वारंवार आणि दीर्घकाळ वीज कपात होत आहे.

CUBA FACES SEVERE POWER AND FUEL CRISIS WITH 22-HOUR BLACKOUTS
Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

अनेक भागांतील नागरिकांना दररोज तब्बल २० ते २२ तास वीज नसल्याचा सामना करावा लागत आहे. परिणामी, घरगुती जीवन विस्कळीत झाले असून, व्यवसाय आणि दैनंदिन कामकाजावरही मोठा परिणाम होत आहे. अन्न साठवणूक, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा यांसारख्या मूलभूत गरजांवरही याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे.

CUBA FACES SEVERE POWER AND FUEL CRISIS WITH 22-HOUR BLACKOUTS
Shocking : धक्कादायक! हॉटेलमधील कर्मचारी महिलेचे अंघोळ करताना फोटो काढले, धमकी देऊन मालकाने अत्याचार केला

यापूर्वीच क्युबावर अन्न, औषधे आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे त्रस्त होता. आता या वीज संकटामुळे नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. गेल्या दोन वर्षांत क्युबाने सौरऊर्जेच्या क्षेत्रात काही प्रमाणात प्रगती करत सुमारे १,३०० मेगावॅट क्षमता वाढवली आहे. तरीही, इंधन तुटवडा (petrol shortage) आणि वीज वितरण प्रणालीमुळे या वाढीचा हवा तसा लाभ मिळत नाही. परिणामी, देशातील वीज निर्मिती आणि पुरवठा व्यवस्था दोन्हीही गंभीर संकटात सापडल्या आहेत. एकूणच, क्युबामधील ही परिस्थिती नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरत असून, सरकारसमोरही तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com