Shocking : धक्कादायक! हॉटेलमधील कर्मचारी महिलेचे अंघोळ करताना फोटो काढले, धमकी देऊन मालकाने अत्याचार केला

Buldhana Crime News : शेगावमध्ये हॉटेल मालकाकडून महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंघोळ करतानाचे फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
SHEGAON HOTEL OWNER ARRESTED FOR SEXUAL EXPLOITATION AND BLACKMAIL CASE
SHEGAON HOTEL OWNER ARRESTED FOR SEXUAL EXPLOITATION AND BLACKMAIL CASESaam Tv
Published On
Summary
  • शेगावातील हॉटेलमध्ये महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण प्रकरण उघड

  • आरोपीने प्रायव्हेट व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप

  • पोलिसांनी आरोपीला अटक करून चौकशी सुरू केली

  • महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

संजय जाधव, बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, एका हॉटेल मालकानेच आपल्या महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव शहरातील खामगाव मार्गावरील एका नामांकित हॉटेलमध्ये अनेक महिला कर्मचारी कार्यरत आहेत. याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका महिलेवर हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्ते याने अत्याचार केल्याचा आरोप आहे. संबंधित महिलेचे अंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ चोरून काढून, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

SHEGAON HOTEL OWNER ARRESTED FOR SEXUAL EXPLOITATION AND BLACKMAIL CASE
Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

इतकेच नव्हे, तर पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक छळही करण्यात आल्याचे समोर आले आहे. भीतीमुळे काही काळ महिलेने या बाबत कोणालाही सांगितले नाही. मात्र, अखेर धाडस करून पीडित महिलेने शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी ज्ञानेश्वर लिप्ते याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार, विनयभंग तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

SHEGAON HOTEL OWNER ARRESTED FOR SEXUAL EXPLOITATION AND BLACKMAIL CASE
Shocking : डोक्यात वार करून हत्या, शीर धडावेगळं करून जाळलं; जन्मदात्या बापानेच रचला मुलीच्या खुनाचा कट, भावाचाही हात

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे शेगाव शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com