Shocking : डोक्यात वार करून हत्या, शीर धडावेगळं करून जाळलं; जन्मदात्या बापानेच रचला मुलीच्या खुनाचा कट, भावाचाही हात

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यात प्रेमसंबंधांच्या संशयातून बापाने आणि भावानेच केली विवाहितेची निर्घृण हत्या. पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर.
FATHER AND BROTHER KILL DAUGHTER IN SHOCKING HONOUR KILLING CASE IN BULDHANA
FATHER AND BROTHER KILL DAUGHTER IN SHOCKING HONOUR KILLING CASE IN BULDHANASaam Tv
Published On
Summary
  • प्रेमसंबंधांच्या संशयातून बाप-भावाने तरुणीची हत्या केली

  • मृतदेह ओळख पटू नये म्हणून शीर धडावेगळे करून जाळण्याचा प्रयत्न

  • घटना बुलढाणा जिल्ह्यातील राजुरा शिवारात उघडकीस आली

  • पोलिस तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात उघडकीस आलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात एका २० ते २५ वयोगटातील एका तरुणीचा अर्धवट जळालेला आणि शीर धडावेगळे केलेला मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास केला असता, तपासात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमसंबंधांच्या संशयातून जन्मदात्या बापाने आणि भावाने मिळून तरुणीची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव शिवानी बापुराम कळमेकर असून ती मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील खडकनार येथील रहिवासी होती. १५ एप्रिल २०२६ रोजी ती लग्नबंधनात अडकली. लग्नानंतरही तिच्या चारित्र्यावर संशय घेत वडील बापुराम कळमेकर यांनी तिच्या हत्येचा कट रचला. शिवानीचे तिच्याच नात्यातील एका तरुणासोबत संबंध असल्याचा संशय त्यांना होता आणि याच संशयातून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.

FATHER AND BROTHER KILL DAUGHTER IN SHOCKING HONOUR KILLING CASE IN BULDHANA
Shocking : राजधानी हादरली! धावत्या स्लीपर बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, चालक आणि कंडक्टर पोलिसांच्या ताब्यात

२३ एप्रिलच्या रात्री बापुराम यांनी मुलगी शिवानीच्या डोक्यात बांबूने जोरदार वार केला, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी मृतदेह एक दिवस घरात लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी मुलगा अजयच्या मदतीने मृतदेह मोटारसायकलवरून महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील राजुरा शिवारात नेण्यात आला. तिथे ओळख पटू नये म्हणून तिचे शीर धडावेगळे करण्यात आले आणि मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हत्येसाठी वापरलेले साहित्य आणि रक्ताने माखलेले कपडे जंगलात टाकून देण्यात आले.

FATHER AND BROTHER KILL DAUGHTER IN SHOCKING HONOUR KILLING CASE IN BULDHANA
Kitchen Hacks : तुम्ही खरेदी केलेले लसूण रासायनिक की नैसर्गिक; 'या' ५ पद्धतीने ओळखा

दरम्यान, बुलढाणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला. संशयित कुटुंबाची चौकशी केली असता आरोपींनी अखेर गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी बापुराम कळमेकर आणि अजय कळमेकर यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पित्यानेच स्वतःच्या लेकीची निर्घृण हत्या केल्याची ही घटना समाजाला हादरवून सोडणारी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com