Shocking : राजधानी हादरली! धावत्या स्लीपर बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, चालक आणि कंडक्टर पोलिसांच्या ताब्यात

Delhi Bus Gang Rape News : दिल्लीमध्ये धावत्या स्लीपर बसमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी चालक आणि कंडक्टरला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
DELHI SHOCKER: WOMAN ASSAULTED IN SLEEPER BUS, DRIVER AND CONDUCTOR ARRESTED
DELHI SHOCKER: WOMAN ASSAULTED IN SLEEPER BUS, DRIVER AND CONDUCTOR ARRESTEDSaam Tv
Published On
Summary
  • दिल्लीतील धावत्या स्लीपर बसमध्ये महिलेसोबत सामूहिक अत्याचाराची घटना

  • बसचालक आणि कंडक्टरला पोलिसांनी अटक केली

  • घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

  • पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून बस जप्त

Delhi Crime News Running Bus Rape राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. धावत्या स्लीपर बसमध्ये एका विवाहित महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत बसचालक आणि कंडक्टरला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारी १२ मे रोजी घडली. संबंधित महिला प्रवासासाठी स्लीपर बसमध्ये चढली. तिच्या या प्रवासादरम्यान ती एकटी असल्याचा फायदा घेत बसचालक आणि कंडक्टरने धावत्या बसमध्ये तिच्यावर जबरदस्ती करत सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अमानुष कृत्यानंतर महिलेने बळ एकवटवून पोलीस ठाणे गाठले. न घाबरता तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.

DELHI SHOCKER: WOMAN ASSAULTED IN SLEEPER BUS, DRIVER AND CONDUCTOR ARRESTED
Shocking : धक्कादायक! आईला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या मुलानं उचललं भयंकर पाऊल

तक्रार दाखल करताच दिल्ली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ तपास सुरू केला. सर्वप्रथम पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत दोन्ही आरोपींना अटक केली. याशिवाय, या गुन्ह्यात वापरण्यात आलेली बसही पोलिसांनी तातडीने जप्त केली आहे.

DELHI SHOCKER: WOMAN ASSAULTED IN SLEEPER BUS, DRIVER AND CONDUCTOR ARRESTED
Shocking : कोचिंग क्लासमधील शिक्षकाचं भयंकर कांड, हॉटेलमध्ये विद्यार्थिनीवर केला बलात्कार; आता २० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुले आहेत. सध्या पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून, पुढील तपास सुरु आहे. दरम्यान पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून आता महिला सार्वजनिक वाहनात देखील सुरक्षित नसल्याचं म्हटलं जात आहे. आरोपींना काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com