Congress Reshuffle : काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ; ३ राज्यांच्या संघटनेत अचानक केले बदल, संजय दत्त यांच्याकडे मोठी जबाबदारी

congress appoints new in charges for three states : काँग्रेस पक्ष संघटनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. काँग्रेसने उत्तर प्रदेशात राजेंद्र पाल गौतम यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. याशिवाय ओडिशात लालजी देसाई आणि हरयाणात संजय दत्त यांना प्रभारीपद दिलं आहे.
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, ३ राज्यांच्या संघटनेत उलथापालथ, कुणाला मिळाली जबाबदारी
Congress Rahul Gandhi and mallikarjun Khargesaam tv
Published On

काँग्रेसने आगामी निवडणुकांची रणनीती लक्षात घेऊन पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मंजुरीनंतर उत्तर प्रदेश, हरयाणा आणि ओडिशा या राज्यांच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रभारींची नियुक्ती केली आहे. या बदलानुसार, राजेंद्र पाल गौतम यांच्याकडे उत्तर प्रदेश, लालजी देसाई यांच्याकडे ओडिशा आणि संजय दत्त यांच्याकडे हरयाणाचे प्रभारीपद देण्यात आले आहे. या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

काँग्रेसच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, उत्तर प्रदेशातील मावळते प्रभारी अविनाश पांडे यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच बी. के. हरिप्रसाद आणि अजय कुमार लल्लू यांच्या कामाचेही कौतुक करण्यात आले आहे. काँग्रेसने नव्या प्रभारींना उत्तर प्रदेश, ओडिशा आणि हरयाणा या राज्यांत संघटना मजबूत आणि निवडणूक तयारी वेगाने करण्याची जबाबदारी दिली आहे.

उत्तर प्रदेशात राजेंद्र पाल गौतम यांची नियुक्ती ही राजकीयदृष्ट्या महत्वाची मानली जात आहे. दिल्ली सरकारमध्ये राजेंद्र पाल गौतम हे मंत्री राहिलेले आहेत. सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनूसूचित जाती या विभागाचे अध्यक्ष आहेत. अनूसूचित समाज विभागात राजेंद्र पाल गौतम यांचे काम बघून काँग्रेसने त्यांना उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही जबाबदारी सोपवली आहे, असे बोलले जात आहे. उत्तर प्रदेशातील जनमत आणखी बळकट करण्यासाठी, विशेषतः एससी समाजातील मतदारांवर प्रभाव निर्माण करण्याची रणनीती काँग्रेसकडून आखली जात असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

उत्तर प्रदेशात बऱ्याच काळापासून काँग्रेस संघटनात्मक पातळीवर आव्हानांचा सामना करत आहे. गौतम यांना प्रभारीपद देऊन सोशल इंजीनिअरिंगसह पक्ष संघटनेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असल्याचे मानले जात आहे. तर ओडिशा आणि हरयाणात नव्या प्रभारींची नियुक्ती ही संघटनेच्या विस्ताराचा भाग असल्याचे बोलले जात आहे. आता हे नवे प्रभारी उत्तर प्रदेश, हरयाणा आणि ओडिशात संघटना किती बळकट करतात आणि त्याचा आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला राजकीयदृष्ट्या किती फायदा होतो हे आगामी काळात स्पष्ट होईल.

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल, ३ राज्यांच्या संघटनेत उलथापालथ, कुणाला मिळाली जबाबदारी
फुटीर खासदारांच्या दारात उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरेंचं मिशन मराठवाडा, फुटीरांना सक्षम पर्याय देण्यात यश मिळणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com