लैंगिक अत्याचार प्रकरणातून काँग्रेस खासदाराची निर्दोष मुक्तता; हायकोर्टाचा निर्णय

Allahabad High Court verdict on Congress MP Rakesh Rathore: अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात दिलासा दिला आहे.
congress  mp news
congress mp news saam tv
Published On: 

उत्तरप्रदेशमधील सीतापूरचे काँग्रेसचे खासदार राकेश राठोड यांना अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने राठोड यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे. तक्रारदार महिला आणि राठोड यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून परस्पर समंतीने संबंध असल्याचे चौकशीत समोर आले आहे. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांनी शुक्रवारी दिलेल्या निर्णयात म्हटले की, राठोड यांनी लग्नाचे आश्वासन देऊन महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. मात्र प्राथमिक तपासात जे काही पुरावे समोर आले त्यातून गुन्हा केल्याचा ठोस संशय निर्माण होत नाही.

congress  mp news
विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात पोलिसात तक्रार दाखल; धक्कादायक कारण आलं समोर

न्यायालयाच्या निरीक्षणानुसार, तक्रारदार महिलेची राठोड यांच्याशी पहिली ओळख सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान झाली होती. त्यानंतर राठोड यांनी तिला राजकीय मदत आणि आघाडीची ऑफर दिली होती. ही ऑफर तिने स्वीकारली. त्यानंतर तिची Tailik Mahasanghच्या जिल्हा महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि या काळात दोघांमधील जवळीक वाढल्याचे न्यायालयाने नमूद केले. तक्रारदार महिलेच्या पतीच्या जबाबाचाही न्यायालयाने विचार केला. तिचा पती राठोड हे तिला वारंवार आपल्या घरी बोलावत असल्याचे आणि काहीवेळा ती रात्री उशिरापर्यंत त्यांच्या घरी थांबत असल्याचे त्याने सांगितले होते.

congress  mp news
'शुद्धीकरण' वादाला नवं वळण; राहुल गांधींवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा

या सर्व परिस्थितीच्या आधारे अभियोजन पक्षाने सादर केलेल्या पुराव्यात दोन विवाहित आणि व्यक्तींमधील दीर्घकाळ चाललेल्या परस्पर संमतीच्या विवाहबाह्य संबंधांचे संकेत मिळत असल्याचे न्यायालयाने म्हटले.

congress  mp news
निशूच्या वडिलांचा हल्लेखोर मोकाटच, गुन्ह्याची जाहीर कबुली, पोलिसांची लक्तरं वेशीला

तक्रारदार महिलेने जानेवारी 2025 मध्ये सीतापूरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. 2020 मध्ये राठोड यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला होता. तसेच, राठोड यांनी पत्नीला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही संबंध सुरू ठेवल्याचा दावा तिने केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com