निशूच्या वडिलांचा हल्लेखोर मोकाटच, गुन्ह्याची जाहीर कबुली, पोलिसांची लक्तरं वेशीला

Nishu Azad’s Father Assault Case: निशू आझादच्या वडिलांना CJPच्या आंदोलनात मारहाण करण्यात आली...मात्र दीड महिने उलटूनही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही... उलट आरोपीनं सोशल मीडियावर गुन्ह्यांची जाहीर कबुली दिलीय...त्यामुळे पोलिसांची लक्तरं वेशीला कशी टागली गेलेत..
Delhi Police accused arrest controversy in CJP protest case
Delhi Police accused arrest controversy in CJP protest casesaam tv
Published On

दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या CJPच्या आंदोलनात आंदोलक निशू आझादच्या वडीलांवर हल्ला करणारा हा आहे हिंदूत्ववादी कार्यकर्ता स्वतंत्र भारद्वाज... निशूच्या वडिलाचं डोकं मीच फोडलं, असं उघडपणे सांगूनही हा गुंड मोकाट फिरतोय...हत्येच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्याखाली जिथे जेलमध्ये असायला हवा... तिथेच हा गुंड भारद्वाज थेट भाजप मंत्र्यांचा पाठिंबा असल्याचं सांगून सोशल मीडियावर गुन्ह्याची जाहीर कबुली देतोय.. आता हा व्हिडिओ पूर्ण पाहा...

भाजप मंत्र्यांच्या आशीर्वादानं सगळं सुरू असल्याचं सांगणाऱ्या भारद्वाजनं निशू आझादच्या व़डिलांना कशी मारहाण केली ते त्यांच्य़ाच तोंडून ऐकूयात...हल्ल्याची जाहीर कबुली देणारा गुंड भारद्वाज गेल्या दीड महिन्यापासून उजड माथ्यानं फिरतोय. मात्र दिल्ली पोलिसांची त्याला अटक कऱण्याची हिंमत झालेली नाही. आणि त्य़ामुळे आता निशानं थेट विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडूनच न्यायाची अपेक्षा व्यक्त केलीय. तर दुसरीकडे CJPनं दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाणे गाठत स्वतंत्र भारद्वाजच्या अटकेची मागणी केली....

निशाच्या विनंतीनंतर राहुल गांधींनी पत्र लिहून निशाच्या पाठीशी असल्याचा निर्धार व्यक्त केलाय. काय म्हणाले आहेत राहुल गांधी पाहूयात...निशू, घाबरण्याची गरज नाही. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू विद्यार्थी आणि तुझ्या समुदायाच्या हक्कासाठी आवाज उठवतेस, म्हणूनच तुला लक्ष्य केले जातंय. अमित शाहांचे दिल्ली पोलीस एकीकडे विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करतात आणि दुसरीकडे एका दलित मुलीच्या वडिलांचं डोकं फोडणारा आरोपी उघडपणे फिरतोय. नरेंद्र मोदीजी आणि अमित शाहजी, अशा गुन्हेगारांना तुमच्या पक्षाचं संरक्षण का आहे? आता तरी कारवाई होणार की आरोपींना वाचवण्याचं काम चालूच राहणार? ही लढाई एकट्याची नाही, न्याय मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही. जय भीम, जय संविधान!

मुळात CJPच्या आंदोलनावेळी स्वतंत्र भारद्वाज दिल्ली उपस्थित होता... तिथे त्यांनी CJPविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करत आंदोलकांना चोप देण्याची भाषा केली होती...आता तर थेट त्यानं आझाद यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याची जाहीर कबुली देऊन थेट दिल्ली पोलीस आणि कायद्याची लक्तरं वेशीला टांगली आहेत. तरीही दिल्ली पोलीस त्याच्यावर अटकेची कारवाई का करत नाहीत? भारद्वाजला मंत्र्यांचं अभय असल्यानेच पाठीशी घातलं जातयं का? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतायत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com