Rahul Gandhi Video: मोठी बातमी! राहुल गांधी असणार लोकसभेतील विरोधी पक्षनेते, इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमताने निर्णय

Lok Sabha Opposition Leader: खासदार राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील, अशी माहिती काँग्रेस पक्षाने दिली आहे.
मोठी बातमी! राहुल गांधी असणार लोकसभेतील विरोधी पक्षनेते, इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमताने निर्णय
Rahul Gandhi Saam tv

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. खासदार राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतील. अशी माहिती काँग्रेस पक्षाने दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने महासचिव केसी वेणुगोपाल यांनी मंगळवारी ही घोषणा केली.

केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, राहुल गांधी यांचे नाव प्रोटेम स्पीकर महताब यांना पाठवण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

मोठी बातमी! राहुल गांधी असणार लोकसभेतील विरोधी पक्षनेते, इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमताने निर्णय
Lok Sabha Speaker Elections : लोकसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी काँग्रेसचा ३ ओळींचा व्हीप, खासदारांना नेमकी काय सूचना?

याआधी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्याची मागणी करण्यात आली होती. बैठकीत काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी राहुल गांधी यांची लोकसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, असा ठराव मंजूर केला होता.

लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांना यावर विचार करण्यासाठी काही वेळ मागितला होता. त्यानंतर आज त्यांना त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

मोठी बातमी! राहुल गांधी असणार लोकसभेतील विरोधी पक्षनेते, इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमताने निर्णय
Cm Eknath Shinde: खते, बियाण्यांचे लिंकींग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यावर कठोर कारवाई करा; मुख्यमंत्र्यांचे कृषी विभागाला निर्देश

दरम्यान, मंगळवारीही लोकसभेचे कामकाज चांगलेच गाजले. सोमवारप्रमाणेच मंगळवारीही प्रोटेम स्पीकर महताब यांनी नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली. मात्र आज 7 खासदारांना शपथ घेता आली नाही. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते भाग घेऊ शकणार नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com