काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

congress : काँग्रेस नेत्यावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी घटनास्थळावरून पळ काढला.
congress news
congressSaam tv
Published On
Summary

भर रस्त्यात गोळीबाराचा थरार

काँग्रेस नेत्यावर गोळीबार

हल्लेखोरांच्या गोळीबारात काँग्रेस नेता गंभीर जखमी

मध्य प्रदेशच्या छतपूर जिल्ह्यात निवडणूक आणि जुन्या वैमनस्यातून काँग्रेस नेता महूम सिंह बुंदेा उर्फ हल्के राजा यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. काँग्रेस नेत्यावर गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. छतपूरच्या इमलिया तिराहजवळ हल्लेखोरांनी कार थांबवून अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात काँग्रेस नेते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात आलं आहे.

छतपूरच्या राजनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विक्रमपूर गावात ही घटना घडली आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेले नेत्याचे भाचे अभय राज सिंह बुंदेला यांच्या माहितीनुसार, हल्के राजा छतरपूरहून गावी निघाले होते. या दरम्यान २ ते ३ वाहनांमधून ७ ते ८ हल्लेखारांनी त्यांच्या कारला घेरलं. त्यानंतर हल्लेखोरांनी जवळपास ६ ते ७ राऊंड गोळीबार केला. त्यानंतर बेसबॉल बॅटनेही हल्ला केला.

congress news
माथेफिरूचा थरार, भीषण गोळीबारात ८ लहान मुलांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com