माथेफिरूचा थरार, भीषण गोळीबारात ८ लहान मुलांचा मृत्यू

america shocking news : अमेरिकेत माथेफिरूने धक्कादायक कृत्य केलं आहे. माथेफिरूने केलेल्या गोळीबारत 8 लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.
america firing
america shocking newsSaam tv
Published On
Summary

अमेरिकेत गोळीबाराचा थरार

लुसियानात 8 जणांवर गोळ्या झाडल्या

माथेफिरूने केलेल्या गोळीबाराने परिसरात खळबळ

अमेरिकेच्या लुसियामध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली आहे. या गोळीबारात ८ लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. लुसियानातील श्रेवपोर्टमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. मृतांमध्ये १ ते १४ वर्षांच्या वयोगटातील लहान मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांचे विभाग प्रमुख क्रिस बोर्डेलॉन यांनी सांगितलं की, घरगुती वाद टोकाला गेला. त्यानंतर माथिफिरूने गोळीबार केला. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे'.

अमेरिकेतील पोलीस अधिकारी क्रिस बोर्डेलॉन यांनी पुढे सांगितलं की, 'घरगुती वादाला हिंसक वळण लागलं. अमेरिकेत सकाळी ६ वाजता वाद सुरू झाला. त्यानंतर हल्लेखोराने गोळीबार सुरू केला. त्याने परिसरात असलेल्या एका पाठोपाठ ८ लहान मुलांना जीव घेतला'.

america firing
धाड धाड...! विद्यार्थ्याकडून भर वर्गात गोळीबार; ४ जणांचा जागीच मृत्यू

गोळीबारानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. पोलिसांनी माथेफिरूचा एन्काऊंटर केला. अमेरिकेच्या लुइसियानामधील श्रेवेपोर्ट, टेक्साच्या सीमेजवळ ही घटना घडली. लोकसंख्येनुसार तिसरं मोठं शहर आहे.

america firing
Parbhani Firing: जुना वाद पुन्हा उफाळला; प्राध्यापक मुंडेंच्या घरावर बेछूट गोळीबार,परिसरात खळबळ

इटलीत दोन भारतीयांची गोळ्या झाडून हत्या

इटलीत दोन भारतीय नागरिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. इटलीच्या बर्गामो प्रांतातील कोवो भागात ही गोळीबाराची घटना घडली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन्ही नागरिक वेअरहाऊसमधून बाहेर पडत होते. त्याचवेळी त्यांच्यावर गोळीबार झाला. दोन्ही भारतीय नागरिकांची ओळख पटली आहे.

america firing
Firing: आधी ओलीस ठेवलं नंतर धाड धाड धाड गोळ्या झाडल्या; सुपरमार्केटमध्ये अंदाधुंद गोळीबार, ६ जणांचा मृत्यू

रागिंदर सिंह, गुरमीत सिंह असे दोन्ही मृत व्यक्तींचे नावे आहेत. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून कारने फरार झाले. हल्लेखोर अचानक घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. घटनास्थळावरून १० रिकामे काडतुसे जप्त करण्यात आली आहे. हल्लेखोराने अनेक गोळ्या झाडल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com