Congress Leader Pawan Khera Reply On PM Modi Question : अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर 'भारतात काय चाललंय?' असा प्रश्न भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विचारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसनं व्हिडिओद्वारे उत्तर दिलं आहे. देशात काही नाही, फक्त फॉग चाललंय, असा चिमटा काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मोदी आणि भाजपला काढला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यावरून नुकतेच भारतात परतले. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर जे. पी. नड्डा यांच्यासह भाजप नेत्यांनी मोदींचे स्वागत केले. त्यावेळी देशात काय चाललं आहे? अशी विचारणा मोदींनी नड्डा यांना केली. यावरून काँग्रेसने मोदी आणि भाजपवर हल्ला चढवला आहे. देशात दुसरं काही नाही, फक्त फॉग चाललं आहे, असं उत्तर पवन खेरा यांनी दिलं.
काँग्रेस (Congress) नेते पवन खेरा यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी जे. पी. नड्डा यांच्यावर निशाणा साधला. तसेच देशात काय चाललंय याचंही उत्तर दिलं. पंतप्रधान मोदीजी तुम्ही नुकतेच विदेशातून मायदेशी परतला आहात. भारतात काय चाललंय असा प्रश्न तुम्ही जे. पी. नड्डा यांना विचारला. नड्डा यांना असा प्रश्न विचारून तुम्ही चुकी केली आहे. कारण तुम्ही नड्डांना पिकअप आणि ड्रॉप करण्याचे काम दिले आहे. नड्डा साहेब फक्त भाजपचा पराभव झाल्यावर जबाबदारी घेतात. त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नाही, असा टोला खेरा यांनी लगावला.
भारतात काय चाललंय हे मी तुम्हाला सांगतो. भारतात फॉग चालला आहे. तुम्ही जाहिरात बघितलीच असेल. या फॉगची निर्मिती तुमच्या आयटी सेलने आणि काही माध्यमांनी केली आहे, अशा शब्दांत पवन खेरा यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
यावेळी काँग्रेस नेते पवन खेरा यांनी मणिपूरच्या हिंसाचाराचा उल्लेख केला. या फॉगमुळे अजूनही मणिपूर धुमसत आहे. या फॉगमुळे बालासोरमध्ये ज्यांचा जीव गेला, त्या घटनेला मुस्लिमांना जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न तुमचा आयटी सेल करत आहे, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.