काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा अपघातात जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

Congress Leader Jitendra Jaiswal Death In Deoria Accident: काँग्रेसचे शहराध्यक्ष जितेंद्र जयस्वाल यांचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
Congress leader Jitendra Jaiswal, who died in a tragic road accident in Deoria, Uttar Pradesh.
Congress leader Jitendra Jaiswal, who died in a tragic road accident in Deoria, Uttar Pradesh.Saam Tv
Published On

उत्तरप्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील बरहाज येथे झालेल्या रस्ते अपघातात काँग्रेसचे दिग्गज नेते जितेंद्र जयस्वाल यांचे निधन झाले आहे. शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राम जानकी मार्गावर एका अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिल्याने ही घटना घडली.

Congress leader Jitendra Jaiswal, who died in a tragic road accident in Deoria, Uttar Pradesh.
Pakistan Terrorist Attack: पाकिस्तानमधील हवाई तळावर आत्मघातकी हल्ला; भिंत ओलांडून घुसले होते ९ दहशतवादी

मिळालेल्या माहितीनुसार, बरहजमधील आझाद नगर दक्षिण येथील रहिवासी आणि काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष, ३५ वर्षीय जितेंद्र जयस्वाल उर्फ ​​जितू, हे कान्हा गोशाळेपासून पूर्वेला सुमारे १०० मीटर अंतरावर आपल्या दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या एका अज्ञात बुलेटने त्यांना धडक दिली. ते रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले. यावेळी स्थानिकांनी आणि कुटुंबीयांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेच्या मदतीने त्यांना तात्काळ बरहाज येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) दाखल केले.

Congress leader Jitendra Jaiswal, who died in a tragic road accident in Deoria, Uttar Pradesh.
रेल्वे कर्मचाऱ्यांना लॉटरी, पगारात बंपर वाढ; KA मध्ये २५ टक्क्यांची वाढ, वाचा कुणाला होणार फायदा?

मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी चौकशी अहवाल तयार करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देवरिया शवागारात पाठवला. या दुःखद घटनेनंतर संपूर्ण शहरासह कॉँग्रेसमध्ये शोकाची लाट पसरली आणि रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.

गेल्या वर्षी मुलाचे झाले होते निधन

जितेंद्र यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी सुनीता, १७ वर्षांचा मुलगा आदर्श आणि मुलगी रिया यांचा समावेश आहे. या घटनेमुळे मोठा धक्का बसला असून गेल्या वर्षी होळीच्या दिवशी त्यांचा मोठा मुलगा रौनक सरयू नदीत बुडून मरण पावल्याने हे कुटुंब आधीच एका मोठ्या दुःखाच्या धक्क्यातून सावरत होते आणि ही आणखी दु:खद घटना घडली. या घटनेचा पोलीस अधिकारी विशाल कुमार यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळाली असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com